Tuesday, 13 October 2020

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०२०-२१

 यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई -नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम.

मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(एक युवक व एक युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(एक युवक व एक युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्‍या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्‍या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२० अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म  www.ycpmumbai.com  या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन दि. १ डिसेंबर २०२० च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,मंत्रालयासमोर,मुंबई - २१ या  पत्त्यावर,अथवा  navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनिषा खिल्लारे) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

Friday, 3 April 2020

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही... : मानवी संवेदनांचा खराखुरा मित्र व्हॉट्सअ‍ॅप?

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK



मानवी संवेदनांचा खराखुरा मित्र व्हॉट्सअ‍ॅप?
सोशल मिडीया आज जीवनाचा अपरिहार्य भाग झाला आहे. विचारांची माहिती आदान प्रदान करणारे हे माध्यम आभासी आणि तितकेच मानवी संवदेनांना बधीर करणारे ठरत आहे का? ही भिती सर्वांसमोर उभी आहे. सोशल मिडीयामुळे लोकसमूहाच्या अनेक कृतींमध्ये आपण असतो ही जाणीव मनाला आनंदित करणारी वाटते तसेच आपण काही तरी वेगळा विचार मेसेजच्या माध्यमातून देतो आहोत. खरंतर तो विचार फॉरवर्डेड आणि तत्कालिक असतो.
आज अनेक युजर्स आपल्या मानसिकतेशी निगडीत बातम्या पोस्टच्या शोधात असतात आणि त्यातून बहुतांशी विघातकताही समोर येते सामाजिक हिताचा विचार करणारी विधायकतेशी नाते जोडणारे माध्यम म्हणून माध्यमाचा खरा चेहरा आहे, त्यासाठी ती निर्माण झाली असावीत याची यत्किंचीतही जाणीव आज नसल्याचे प्रकर्षाने लक्षात येते आहे. मित्र मैत्रीणी, नातेवाईक यांच्याशी सुख:दु:ख जाणून घेण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यातील बरेवाईट अनुभव शेअर करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे सहज सोपे माध्यम आहे. त्यातून जगरहाटीच्या अनेक घटना कळतात आणि त्यांच्या भावनाही कळतात. माझ्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅप वापरणे हे काहीतरी नवे जाणून घेण्याचे माध्यम आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान आणि उपयुक्त माहिती यांची सांगड घालून जगणे समजून घेणे या प्रक्रीयेकडे मी पाहतो. वर्तमानकाळात, समकाळात होणारे सामाजिक, सांस्कृतिक राजकीय बदलांविषयीचे विचार, विश्‍लेषण वाचून ती त्यावर तटस्थपणे बघून माझे स्वत:चे मत तयार करत असतो. एक नागरीक म्हणून ती माझी जबाबदारी आहे.
व्हाट्सअ‍ॅपवरील आरोग्य विषयक माहितीतून निरोगी आयुष्य जगण्याची दिशा मिळते. त्याचाही नेमका उपयोग जीवन शैलीत करता येतो. अनेक जुन्या मित्रांच्या भेटी धावपळीच्या काळात होत नाहीत. परंतू व्हॉट्सअ‍ॅपमुळे त्यांच्या जुन्या आठवणींसोबत रेंगाळता येते. मैत्रीचं नातं जपण्याचं हे सशक्त आणि अलवार माध्यम वाटतं. कौटुंबिक नातं, जिव्हाळ्याच्या व्यक्तींशी कनेक्ट राहण्यासाठी मला गरजेचे वाटते. माझ्यातील एकाकीपणाला, चिंतनाला व्हॉट्सअ‍ॅप अडचण ठरत नाही. त्याचा सकारात्मक व मानसिक गरजेपुरता वापर केल्यास त्यातील आनंद अबाधित राहतो.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 31 March 2020

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही.. : इनक्रेडीबल इंडिया ( अतुल्य भारत ) मन में हे विश्वास संहारक करोना रुग्ण


मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK



इनक्रेडीबल इंडिया
( अतुल्य भारत )
मन में हे विश्वास
संहारक करोना रुग्ण
'घटनाक्रम
) 29 जाने 20 मध्ये करोना चा  पहिला रुग्ण भारतात सापडला आणि मार्च नंतर रुग्णसंख्या वाढत गेली. आज ,सुमारे २५ दिवसांनंतर आपली रुग्णसंख्या पोहोचली आहे १००० पर्यंत जी सर्वार्थाने आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्रांपेक्षा  लोकसंख्या आणि रुग्णसंख्या याची सरासरी मांडली , तर तुलनेने कमी म्हणता येईल.
) १३० कोटी लोकसंख्या असलेले राष्ट्र लॉक डाऊन यशस्वीपणे राबवत आहे आणि १०० कोटी हून अधिक जनतेचा सकारात्मक  प्रतिसाद हे अभूतपूर्व उदाहरण आहे जेव्हा प्रगत राष्ट्रे या आपत्तीचे गांभिर्य जनतेच्या गळी उतरवण्यासाठी अजूनही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.
) साधनसामुग्री तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत टाटा ,महिंद्रा, मारुती आदी वाहन उद्योगातील अग्रगण्य उद्योगसमुहांनी भरघोस आर्थिक मदत पुढे केली. त्या व्यतिरिक्त उत्पादन खर्च मर्यादित ठेवून माफक किमतीत  व्हेंटिलेटर उत्पादन पण सुरू केले आहे.
) सोशल डीस्टेन्ससिंग साठी प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर खडूने मार्किंग केलेलं दिसून येत आहे आणि लोक सुरक्षित अंतरावरून अत्यावश्यक सेवांचा लाभ घेत आहेत, हे विशेष आहे.

) सरकारने प्रथमच आश्वासीत केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, औषधे यांचा कुठेही तुडवडा नाही आणि लोकही शिस्तबद्ध पद्धतीने,सुरक्षित अंतर राखून ठराविक वेळेत खरेदी करीत आहेत. साठेबाजांवर कडक कारवाई केली जात आहे जेणेकरून या वस्तूंचा काळाबाजार होऊ नये.
) BSNL सारख्या संस्था अखंडितपणे दर्जेदार सेवा पुरवीत आहे जेणेकरून लोकांना लॉक डाऊन सुसह्य होईल आणि इंटरनेट सारख्या सुविधां द्वारे घरी बसून काम  (work from home) आवश्यक माहिती प्राप्त करता येईल.
) भारतीय शास्त्रज्ञ स्वस्त दरात रोग निदान करणारे किटस,लस विषाणू विघटित करणारे तंत्र विकसित करत आहेत ज्यामुळे या रोगावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. जयपूरमध्ये डॉक्टरच्या टीमने प्रथमच अँटीमलेरीयल आणि अँटी एचआयव्ही ड्रग यांचा संयुक्त वापर करून करोना रुग्णांवरवर उपचार केला जो आता जागतिक पातळीवर केला जातो आहे
) IIT चे विद्यार्थी पण यात मागे नाहीत. ज्या कपड्यावर विषाणू फार काळ जिवंत राहू शकणार नाही असे अभिनव फॅब्रिक ते विकसित करत आहेत.
) या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर देखील सर्व सीमा सुरक्षा यंत्रणेने बंद केल्या असून प्रत्येक गावात आता गावकऱ्यांकडून  स्वयंघोषित 'गावबंदी' पाळली जात आहे हे कौतुकास्पद !
१०) रेल्वेसेवा बंद झाल्यानंतर रेल्वेबोगीचे आय सी यु मध्ये रूपांतर करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी होतोय. भारतीय रेल्वेची व्याप्ती फार मोठी आहे त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय सेवा पुरवणे आता सहज शक्य आहे. करोनाबाधितांचे वर्गीकरण, निर्जंतुकिकरण आणि आवश्यक तेथे वैद्यकीयसेवा या द्वारे उपलब्ध होणार आहे.
११) पोलीस दल, होम गार्डस, डॉक्टर, मेडिकल हेल्थकेअर संस्था यांच्या कष्टाला मानाचा मुजरा ! स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबियांची काळजी हे दोन्ही पणाला लावून हे लोक देशसेवा करत आहेत.

१२) विविध सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या, गृह निर्माण आस्थापना, स्वयंसेवी संस्था, सिने -नाट्य कलाकार आदी  मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी, औषधे , वैद्यकीय मदत इत्यादी उपलब्ध करून देत आहेत. लॉक डाऊन मध्ये कोणी उपाशीपोटी झोपणार नाही , याची काळजी घेत आहेत. हे फक्त माझ्या देशातच घडु शकते.
ही यादी कधी संपणारी आहे.
आता विनंती एकच
आपण कोरोना विषाणू वाढू देण्याच्या प्रमुख टप्प्यात आहोत आणि हा आठवडा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त एवढेच करा की घराबाहेर पडू नका आणि ही संसर्गाची साखळी खंडित करा. आपल्या जगण्याची किंमत ठरवा आणि तमाम यंत्रणेच्या कष्टाला फळ मिळेल याची जबाबदारी घ्या.  सरकारने केव्हाच आवश्यक पाऊले उचलली आहेत आता आपले सहकार्याचे एक पाऊल अपेक्षित आहे.
ही निर्णायक लढाई आपणच जिंकणार आहोत ....
ये मन मे है विश्वास !

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 10 December 2019

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा


59वी राज्य नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक तरूण रंगकर्मी त्यात आपला अविष्कार सादर करत आहेत. विविध समकालीन प्रश्‍न, पारंपारिक प्रश्‍न यांचा वेध घेत आहेत. आणि आपलं म्हणणं जोरकसपणे मांडत आहेत. यात प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट अशी की नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक नाट्यसंस्था, कलावंत, नाटके सादर करत आहेत व आपल्या सादरीकरणाने अभिनयाने नवा विचार देण्यात यशस्वी होत आहेत.
आज सर्व ठिकाणी रंगभूमीच्या विकासाविषयी, अस्तित्वाविषयी परिसंवाद होत आहेत. विचारमंथन होत आहेत. परंतू गाव-खेड्यात सादर होणार्‍या लोककला, लोकनाट्य याबरोबरच आज तरूण पिढी नाटक या माध्यमाला आपलेसे करत आहे आणि योगदान देत आहे. समूहातून, एकत्रितपणातून कलेची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेत आहेत. हे रंगभूमीला बळ देणारे आहे. महानगराबाहेर खर्‍या अर्थाने ‘नाटक’ ही कला जोमाने विकसित होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कलावंत, सिनेमा, मालिका, निर्मिती क्षेत्रात नाव कमवत आहेत. नाटककार, लेखक आपल्या लेखनातून नवे विश्व जगासमोर आण आहेत. रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी नाट्यस्पर्धा ही प्रयत्नांचा भाग आहे. त्यातून अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळते आहे व आपल्यातील कलागुणांना दिशा मिळत आहे. स्पर्धेतील पहिल्या पाच नाटकांचे प्रयोग शासनामार्फत, तालुका पातळीवर केल्यास अनेक नवीन व धडपड करणार्‍या कलावंतांना बळ मिळेल व त्यांच्या नाट्यप्रवासाला पूरकही ठरेल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 30 August 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

लव्ह यू नाशिक... कारण


नाशिक शहराच्या विकासासाठी अनेक व्यक्ती सामाजिक संस्था हातभार लावत आहेत आणि त्यातूनच नाशिकचे नवे रूप समोर येत आहे. अगदी सामान्य माणूसही यासाठी योगदान देत आहे. याचं एक उदाहरण म्हणजे मायको सर्कल जवळील डिव्हायडरमधील झाडांना एक व्यक्ती नित्यनेमाने सामाजिक जाणिवेतून पाणी टाकतो. असेच उदाहरण इंदिरानगर परिसरातही आहे. हे शहर आपलं आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी सकारात्मक केले पाहिजे ही जाणीव या मागे आहे. कुठल्याही पुरस्काराची, सन्मानाची अपेक्षा या लोकांना नाही. अशी खूप माणसे नाशिकच्या सुंदरतेसाठी झटत आहेत. 
कचरा निर्मूलनासाठी, प्लास्टिक निर्मूलनासाठीही अनेक संस्था अग्रेसर आहेत व प्रामाणिकपणे काम करत आहेत. हे गाव आपलं आहे आणि त्या गावाचं गावपण जपणं आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येकात रूजवणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन व पार्कींगसाठी शिस्तशीर राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाशिकसाठी आपण काही विधायक काम करू शकतो का? आणि त्याचा सर्वांनाच उपयोग होईल ही जाणीव निर्माण होण्यासाठीच ‘# लव्ह यू नाशिक’ हा कृतीशिल मंत्र ठरेल. यात आपण काही नाशिकसाठी सामाजिक जाणिवेतून काम केले असेल त्याचे छायाचित्र किंवा माहिती अपलोड करून ‘# लव्ह यू नाशिक’ ही संकल्पना असलेल्या फेसबुकवर पाठवावी व जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे. 

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur