१० वी चा निकाल…
आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेत इयत्ता १०वी ला मोठ मानाचं व मोलाचं स्थान आहे. आपला पाल्य चांगल्या मार्कांनी १० वी पास झाला म्हणजे त्याने आयुष्यातील एक मोठा टप्पा पार केला असा भावनाशील स्पर्श प्रत्येक पालकाच्या हृदयाला होतो आणि आपल्या पाल्याचे तोंडभरून कौतुक करतांना पालकांचे डोळे भरून येतात. म्हणून पाल्यांनीही / विद्यार्थ्यांनीही डोळ्यांत तेल घालून अभ्यास करणे महत्वाचे असते. आणि सर्वच मुले-मूली आपल्या जबाबदारीचं भान ठेवत स्वत:च्या उज्वल भविष्यासाठी अपार कष्ट घेत अभ्यास सुद्धा करत असतात.
या
१० वी च्या निकालापासूनच विद्यार्थ्यांची आयुष्याची खरी घोडदौड सुरू होत असते. एक प्रकारे आजच्या स्पर्धेच्या युगात प्रवेश घेण्यासाठीचा प्रवेश अर्ज म्हणूनच १० वीच्या निकालाकडे बघितलं जात.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देणारा हा निकाल…
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखाला बळ देणारा हा निकाल…
या
निकालाच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व् मित्र परिवाराला मन:पूर्वक सदिच्छा!
आणि या १० वी निकालात ज्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलं नाही. त्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने या प्रसंगाला सामोरे जावे. कारण आशेचे, निराशेचे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात. पण विचारांचा, आत्मविश्वासाचा भक्कम पाया असला की कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभं राहाता येतं. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीच खऱ्या अर्थाने आपल्या ताकदी व कमतरता यांची जाणीव आपल्याला करून देतात. त्यातून बळ घेवूनच आपण आपली आयुष्याची पुढची धोरणं ठरविली पाहिजे आणि येणाऱ्या सर्व प्रसंगाना मोठ्या धैर्याने व आनंदाने स्विकारलं पाहिजे.
आपला,
श्री.
विश्र्वास ठाकूर