Wednesday, 25 July 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


नाशिकची वाहतूक आणि स्वयंशिस्त

नाशिकमधील रस्ते वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्तपणा हे यामागचे कारण आहे. रस्ते वाहतूकीमध्ये होणारे अपघात हा ही एक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. हे अपघात कमी होण्यासाठी वाहनचालकाने काळजी घेण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्‍चितच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक शहरात 1 जानेवारी ते 30 जून 2018 या कालावधीत झालेल्या 99 जीवघेण्या अपघातांमध्ये 100 जणांचा बळी गेला आहे. 2017 च्या याच कालावधीच्या तुलनेने ही वाढ काहीशी झालेली आहे.
वाहतूकीतील अपघात रोखण्यासाठी नुस्तीच कारवाई हा उपाय नसून त्यासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरात सर्वाधिक अपघात हे दुचाकी स्वारांचे होत असतात. तसेच रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍यांना धडक देण्याचे प्रमाणही जास्त आहे. हेल्मेट सक्ती सीटबेल्टचा वापर आणि वाहनांची गती कमी करणे हे मूलभूत उपाय यावर आहेत त्याची अमलबजावणी प्रत्येक नागरीकाने केल्यास सकारात्मक चित्र दिसेल.
शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीपासून शहर वाहतूक शाखेत अनेक प्रबोधनात्मक उपक्रम राबवले आहेत व राबवत आहे. त्याचेही चांगले परिणाम दिसून येत आहेत. नाशिकचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगण्याबरोबरच प्रशासन यंत्रणेला सहकार्य करणे तितकेच गरजेचे आहे.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 6 July 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


वंचितांचे शिक्षण आणि नाशिक

नाशिक शहराची शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल गुणवत्तापूर्ण व आधुनिक आहे. आज देशातील अनेक महत्त्वाच्या शिक्षण संस्था नाशिकमध्ये आल्या आहेत. त्यातून शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. नाशिकमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जात असत. पण नाशिकने अल्पावधीतच ‘एज्युकेशन हब’ म्हणून मान्यता मिळविलेली आहे. आज नाशिक व परिसरातील महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्याचबरोबर एका बाजूला झोपडपट्टी आणि कामगार वस्तीतील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक साहित्य, सकस आहार, शाळांना संगणक, खेळाचे साहित्याचे वाटप, ह्या काही मुलभूत गरजाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जेणेकरुन, त्यांच्या विकासाला चालना मिळेल व शिक्षण विकासाचे चित्र समोर येईल. सामाजिक संस्था, औद्योगिक वसाहतींनी यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन, या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

ब्लॉग क्रमांक : 51

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
नाशिक उद्योग-व्यवसायासाठी ‘स्किल सिटी’

नाशिकची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे होत असतांना इथल्या रोजगार व उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी, विकासासाठी निश्‍चित पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. याचाच एक भाग म्हणून ‘स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका नाशिक’ यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून सुमारे दहा हजार युवकांना कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्यातून ‘स्किल सिटी’ करण्याची संकल्पना आहे.
नाशिकमध्ये आज अनेक उद्योग व्यवसाय येत असून मोठ-मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. उद्योग व्यवसायाच्या उद्योग-वाढीसाठी पायाभूत सुविधांबरोबरच तंत्र कुशल मनुष्यबळ असण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये अनेक शिक्षणसंस्था अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यातून अनेक तरूण पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी केल्यास नवे चित्र समोर येईल. युवकांच्या ज्ञानाला उद्योजक केंद्रीत मार्गदर्शन केल्यास त्यांच्यात नवे घडवण्याची मानसिकता निर्माण होईल. बांधकाम व्यावसायिक संस्था, इलेक्ट्रॉनिक कंपन्या अशा अनेक क्षेत्रात या तरूणांना संधी दिल्यास नाशिकच्या आधुनिक विकासाचे चित्र समोर येईल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur