मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. जगण्याचा आशय शोधून देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तकांच्या मैत्रीची शिदोरी आयुष्यभर पुरणारी असते. यानिमित्ताने नाशिकमध्ये अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये या दिनांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आजच्या व्हर्च्युअल जगात पुस्तकांशी असलेलं नातं अधिकाधिक घट्ट होण्यासाठी ‘वाचन प्रेरणा दिना’सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. यातून वाचन संस्कृतीच्या विकासाला निश्चितच हातभार लागेल. नाशकात अनेक ग्रंथालये आहेत. त्यांना त्यांचे वेगळेपण आहे, परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज वाचनालय, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, सुभाष वाचनालय ही वाचनालये अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात. आणि वाचन चळवळीला प्रोत्साहन देत असतात. उद्याचा संपन्न विचारांचा नागरीक घडवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कर्तुत्ववान, महान व्यक्तींच्या कार्याची माहिती ग्रंथालयांच्या माध्यमातून पोहचवणे काळाची गरज आहे. सक्षम, रचनात्मक विचार ग्रंथालयेच देऊ शकतात हे मात्र निश्चित.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur