Friday, 16 November 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
कलावंतांच्या अविष्काराची जाणीव बहरावी म्हणून...

कलावंतांना नाट्यकलेचा अविष्कार सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून असलेली ‘58व्या राज्य हौशी मराठी स्पर्धे’ची प्राथमिक फेरी 15 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. नाशिकच्या रंगभूमीला दैदिप्यमान इतिहास आहे. नाशिकची रंगभूमी कलावंताची खाण आहे आणि त्यांनी नाशिकचे कलाविश्व समृद्ध केले आहे. नाशिकच्या कलावंतांनी प्रायोगिक समांतर, व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग केले आणि त्याला रसिकांनी उस्फूर्त दाद दिली आहे. 
नाशकात सातत्याने अनेक संंगीत मैफीली, नाट्यविष्कार सादर होत असतात. आणि त्यातून इथल्या रसिकांना अभिरूची संपन्न मेजवानी मिळत असते. त्यामुळे अनेक कलावंतांना प्रेरणा मिळत आहे. मुंबई-पुण्याच्या कलाविश्वात आपल्या कर्तुत्वाने नाशिककर कलावंत मोहर उमटवत आहेत. तसेच एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन इथल्या नवोदित कलावंतांना बळ देणारे, आत्मविश्वास देणारे आहे. 
आज कलेच्या अविष्कारासाठी अनेक माध्यमे सुरू आहेत आणि त्यातून कलावंतांना अनेक संधी खुणावत आहेत. यासाठी नाशिकमध्ये कलाविषयक प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन होणे गरजेचे आहे. त्यातून कलावंतांना दिशा व मार्गदर्शन मिळेल. यामध्ये सर्वच कलांचा समावेश असावा जेणेकरून एकाच छताखाली कलांचा संगम होईल व नाशिक कलापीठ निर्माण होईल.

विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur