मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
लव्ह यू नाशिक... कारण
नाशिक शहराच्या विकासासाठी अनेक व्यक्ती सामाजिक संस्था हातभार लावत आहेत आणि त्यातूनच नाशिकचे नवे रूप समोर येत आहे. अगदी सामान्य माणूसही यासाठी योगदान देत आहे. याचं एक उदाहरण म्हणजे मायको सर्कल जवळील डिव्हायडरमधील झाडांना एक व्यक्ती नित्यनेमाने सामाजिक जाणिवेतून पाणी टाकतो. असेच उदाहरण इंदिरानगर परिसरातही आहे. हे शहर आपलं आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी सकारात्मक केले पाहिजे ही जाणीव या मागे आहे. कुठल्याही पुरस्काराची, सन्मानाची अपेक्षा या लोकांना नाही. अशी खूप माणसे नाशिकच्या सुंदरतेसाठी झटत आहेत.
कचरा निर्मूलनासाठी, प्लास्टिक निर्मूलनासाठीही अनेक संस्था अग्रेसर आहेत व प्रामाणिकपणे काम करत आहेत. हे गाव आपलं आहे आणि त्या गावाचं गावपण जपणं आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येकात रूजवणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन व पार्कींगसाठी शिस्तशीर राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाशिकसाठी आपण काही विधायक काम करू शकतो का? आणि त्याचा सर्वांनाच उपयोग होईल ही जाणीव निर्माण होण्यासाठीच ‘# लव्ह यू नाशिक’ हा कृतीशिल मंत्र ठरेल. यात आपण काही नाशिकसाठी सामाजिक जाणिवेतून काम केले असेल त्याचे छायाचित्र किंवा माहिती अपलोड करून ‘# लव्ह यू नाशिक’ ही संकल्पना असलेल्या फेसबुकवर पाठवावी व जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur