Tuesday, 10 December 2019

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा


59वी राज्य नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक तरूण रंगकर्मी त्यात आपला अविष्कार सादर करत आहेत. विविध समकालीन प्रश्‍न, पारंपारिक प्रश्‍न यांचा वेध घेत आहेत. आणि आपलं म्हणणं जोरकसपणे मांडत आहेत. यात प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट अशी की नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक नाट्यसंस्था, कलावंत, नाटके सादर करत आहेत व आपल्या सादरीकरणाने अभिनयाने नवा विचार देण्यात यशस्वी होत आहेत.
आज सर्व ठिकाणी रंगभूमीच्या विकासाविषयी, अस्तित्वाविषयी परिसंवाद होत आहेत. विचारमंथन होत आहेत. परंतू गाव-खेड्यात सादर होणार्‍या लोककला, लोकनाट्य याबरोबरच आज तरूण पिढी नाटक या माध्यमाला आपलेसे करत आहे आणि योगदान देत आहे. समूहातून, एकत्रितपणातून कलेची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेत आहेत. हे रंगभूमीला बळ देणारे आहे. महानगराबाहेर खर्‍या अर्थाने ‘नाटक’ ही कला जोमाने विकसित होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कलावंत, सिनेमा, मालिका, निर्मिती क्षेत्रात नाव कमवत आहेत. नाटककार, लेखक आपल्या लेखनातून नवे विश्व जगासमोर आण आहेत. रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी नाट्यस्पर्धा ही प्रयत्नांचा भाग आहे. त्यातून अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळते आहे व आपल्यातील कलागुणांना दिशा मिळत आहे. स्पर्धेतील पहिल्या पाच नाटकांचे प्रयोग शासनामार्फत, तालुका पातळीवर केल्यास अनेक नवीन व धडपड करणार्‍या कलावंतांना बळ मिळेल व त्यांच्या नाट्यप्रवासाला पूरकही ठरेल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur