Tuesday, 31 March 2020

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही.. : इनक्रेडीबल इंडिया ( अतुल्य भारत ) मन में हे विश्वास संहारक करोना रुग्ण


मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK



इनक्रेडीबल इंडिया
( अतुल्य भारत )
मन में हे विश्वास
संहारक करोना रुग्ण
'घटनाक्रम
) 29 जाने 20 मध्ये करोना चा  पहिला रुग्ण भारतात सापडला आणि मार्च नंतर रुग्णसंख्या वाढत गेली. आज ,सुमारे २५ दिवसांनंतर आपली रुग्णसंख्या पोहोचली आहे १००० पर्यंत जी सर्वार्थाने आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्रांपेक्षा  लोकसंख्या आणि रुग्णसंख्या याची सरासरी मांडली , तर तुलनेने कमी म्हणता येईल.
) १३० कोटी लोकसंख्या असलेले राष्ट्र लॉक डाऊन यशस्वीपणे राबवत आहे आणि १०० कोटी हून अधिक जनतेचा सकारात्मक  प्रतिसाद हे अभूतपूर्व उदाहरण आहे जेव्हा प्रगत राष्ट्रे या आपत्तीचे गांभिर्य जनतेच्या गळी उतरवण्यासाठी अजूनही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.
) साधनसामुग्री तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत टाटा ,महिंद्रा, मारुती आदी वाहन उद्योगातील अग्रगण्य उद्योगसमुहांनी भरघोस आर्थिक मदत पुढे केली. त्या व्यतिरिक्त उत्पादन खर्च मर्यादित ठेवून माफक किमतीत  व्हेंटिलेटर उत्पादन पण सुरू केले आहे.
) सोशल डीस्टेन्ससिंग साठी प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर खडूने मार्किंग केलेलं दिसून येत आहे आणि लोक सुरक्षित अंतरावरून अत्यावश्यक सेवांचा लाभ घेत आहेत, हे विशेष आहे.

) सरकारने प्रथमच आश्वासीत केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, औषधे यांचा कुठेही तुडवडा नाही आणि लोकही शिस्तबद्ध पद्धतीने,सुरक्षित अंतर राखून ठराविक वेळेत खरेदी करीत आहेत. साठेबाजांवर कडक कारवाई केली जात आहे जेणेकरून या वस्तूंचा काळाबाजार होऊ नये.
) BSNL सारख्या संस्था अखंडितपणे दर्जेदार सेवा पुरवीत आहे जेणेकरून लोकांना लॉक डाऊन सुसह्य होईल आणि इंटरनेट सारख्या सुविधां द्वारे घरी बसून काम  (work from home) आवश्यक माहिती प्राप्त करता येईल.
) भारतीय शास्त्रज्ञ स्वस्त दरात रोग निदान करणारे किटस,लस विषाणू विघटित करणारे तंत्र विकसित करत आहेत ज्यामुळे या रोगावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. जयपूरमध्ये डॉक्टरच्या टीमने प्रथमच अँटीमलेरीयल आणि अँटी एचआयव्ही ड्रग यांचा संयुक्त वापर करून करोना रुग्णांवरवर उपचार केला जो आता जागतिक पातळीवर केला जातो आहे
) IIT चे विद्यार्थी पण यात मागे नाहीत. ज्या कपड्यावर विषाणू फार काळ जिवंत राहू शकणार नाही असे अभिनव फॅब्रिक ते विकसित करत आहेत.
) या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर देखील सर्व सीमा सुरक्षा यंत्रणेने बंद केल्या असून प्रत्येक गावात आता गावकऱ्यांकडून  स्वयंघोषित 'गावबंदी' पाळली जात आहे हे कौतुकास्पद !
१०) रेल्वेसेवा बंद झाल्यानंतर रेल्वेबोगीचे आय सी यु मध्ये रूपांतर करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी होतोय. भारतीय रेल्वेची व्याप्ती फार मोठी आहे त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय सेवा पुरवणे आता सहज शक्य आहे. करोनाबाधितांचे वर्गीकरण, निर्जंतुकिकरण आणि आवश्यक तेथे वैद्यकीयसेवा या द्वारे उपलब्ध होणार आहे.
११) पोलीस दल, होम गार्डस, डॉक्टर, मेडिकल हेल्थकेअर संस्था यांच्या कष्टाला मानाचा मुजरा ! स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबियांची काळजी हे दोन्ही पणाला लावून हे लोक देशसेवा करत आहेत.

१२) विविध सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या, गृह निर्माण आस्थापना, स्वयंसेवी संस्था, सिने -नाट्य कलाकार आदी  मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी, औषधे , वैद्यकीय मदत इत्यादी उपलब्ध करून देत आहेत. लॉक डाऊन मध्ये कोणी उपाशीपोटी झोपणार नाही , याची काळजी घेत आहेत. हे फक्त माझ्या देशातच घडु शकते.
ही यादी कधी संपणारी आहे.
आता विनंती एकच
आपण कोरोना विषाणू वाढू देण्याच्या प्रमुख टप्प्यात आहोत आणि हा आठवडा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त एवढेच करा की घराबाहेर पडू नका आणि ही संसर्गाची साखळी खंडित करा. आपल्या जगण्याची किंमत ठरवा आणि तमाम यंत्रणेच्या कष्टाला फळ मिळेल याची जबाबदारी घ्या.  सरकारने केव्हाच आवश्यक पाऊले उचलली आहेत आता आपले सहकार्याचे एक पाऊल अपेक्षित आहे.
ही निर्णायक लढाई आपणच जिंकणार आहोत ....
ये मन मे है विश्वास !

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur