Friday, 3 April 2020

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही... : मानवी संवेदनांचा खराखुरा मित्र व्हॉट्सअ‍ॅप?

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK



मानवी संवेदनांचा खराखुरा मित्र व्हॉट्सअ‍ॅप?
सोशल मिडीया आज जीवनाचा अपरिहार्य भाग झाला आहे. विचारांची माहिती आदान प्रदान करणारे हे माध्यम आभासी आणि तितकेच मानवी संवदेनांना बधीर करणारे ठरत आहे का? ही भिती सर्वांसमोर उभी आहे. सोशल मिडीयामुळे लोकसमूहाच्या अनेक कृतींमध्ये आपण असतो ही जाणीव मनाला आनंदित करणारी वाटते तसेच आपण काही तरी वेगळा विचार मेसेजच्या माध्यमातून देतो आहोत. खरंतर तो विचार फॉरवर्डेड आणि तत्कालिक असतो.
आज अनेक युजर्स आपल्या मानसिकतेशी निगडीत बातम्या पोस्टच्या शोधात असतात आणि त्यातून बहुतांशी विघातकताही समोर येते सामाजिक हिताचा विचार करणारी विधायकतेशी नाते जोडणारे माध्यम म्हणून माध्यमाचा खरा चेहरा आहे, त्यासाठी ती निर्माण झाली असावीत याची यत्किंचीतही जाणीव आज नसल्याचे प्रकर्षाने लक्षात येते आहे. मित्र मैत्रीणी, नातेवाईक यांच्याशी सुख:दु:ख जाणून घेण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यातील बरेवाईट अनुभव शेअर करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे सहज सोपे माध्यम आहे. त्यातून जगरहाटीच्या अनेक घटना कळतात आणि त्यांच्या भावनाही कळतात. माझ्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅप वापरणे हे काहीतरी नवे जाणून घेण्याचे माध्यम आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान आणि उपयुक्त माहिती यांची सांगड घालून जगणे समजून घेणे या प्रक्रीयेकडे मी पाहतो. वर्तमानकाळात, समकाळात होणारे सामाजिक, सांस्कृतिक राजकीय बदलांविषयीचे विचार, विश्‍लेषण वाचून ती त्यावर तटस्थपणे बघून माझे स्वत:चे मत तयार करत असतो. एक नागरीक म्हणून ती माझी जबाबदारी आहे.
व्हाट्सअ‍ॅपवरील आरोग्य विषयक माहितीतून निरोगी आयुष्य जगण्याची दिशा मिळते. त्याचाही नेमका उपयोग जीवन शैलीत करता येतो. अनेक जुन्या मित्रांच्या भेटी धावपळीच्या काळात होत नाहीत. परंतू व्हॉट्सअ‍ॅपमुळे त्यांच्या जुन्या आठवणींसोबत रेंगाळता येते. मैत्रीचं नातं जपण्याचं हे सशक्त आणि अलवार माध्यम वाटतं. कौटुंबिक नातं, जिव्हाळ्याच्या व्यक्तींशी कनेक्ट राहण्यासाठी मला गरजेचे वाटते. माझ्यातील एकाकीपणाला, चिंतनाला व्हॉट्सअ‍ॅप अडचण ठरत नाही. त्याचा सकारात्मक व मानसिक गरजेपुरता वापर केल्यास त्यातील आनंद अबाधित राहतो.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur