पीएसएलव्ही
सी-२३ च्या यशस्वी उड्डाणाबद्दल सर्व भारतीयांचे व शास्त्रज्ञांचे मन:पुर्वक अभिनंदन!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे यश मिळविले आहे. स्वदेशी बनावटीच्या 'पीएसएलव्ही सी-२३' या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या माध्यमातून जर्मनी, कॅनडा, फ्रान्स व सिंगापूरचे पाच उपग्रह यशस्वी प्रक्षेपण करून त्यांना त्यांच्या कक्षेत प्रस्थापित केले आहे.
देश
वैज्ञानिक क्षेत्रात आत्मनिर्भर होत असल्याचे हे सूचक उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी याची अत्यंत जरूरी आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या कर्तबगारीचे एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. प्रत्येक भारतीयांद्वारे होणारे कौतुक हीच शास्त्रज्ञांना त्यांच्या पुढील कामासाठी मोठी प्रेरणा असते.
देशाच्या दुर्गम भागात राहणारा जनसामान्य नागरिक ते विकसित शहरातील व्यक्ती अशा सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी, गोरगरीबांच्या मूलभूत गरजा भाविण्यासाठी याप्रकाराच्या मोहिमा नियमित होणे महत्वाचे आहे. या मोहिमांच्या व अवकाशातील उपग्रहाच्या माध्यमातून देशाच्या भौगोलिक व इतर अनेक परिस्थितीचा अभ्यास होण्यास मोलाचा हातभार लागतो. आणि हे सर्व घटक अभ्यासूनच देशाची विकासाची अपेक्षीत धोरण तयार होत असतात.
जसा देशातील एका व्यक्तीचा होणारा विकास हा देशाच्या विकासात मोलाचा घटक ठरत असतो, तसाच देशाचा होणारा विकास हा प्रत्येक व्यक्तीच्या विकासात महत्वाचा घटक ठरत असतो. तेव्हा अभिमान बाळगूया आपल्या शास्त्रज्ञांचा आणि आपण भारतीय असल्याचा!
No comments:
Post a Comment