Tuesday, 10 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकचे कलासंचित जपण्यासाठी’


नाशिक कला शिक्षकांच्या ‘व्हीजन’ नावाच्या विभागीय मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून जाण्याचा योग आला. यात नाशिक, धुळे परिसरातील कलाशिक्षकांचा सहभाग होता. कलेचा प्रसार कलाशिक्षणातील अडचणी, कलाशिक्षणाचे अभ्यासक्रम यावर हे शिक्षक काम करतात. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कलेची निर्मिती अविष्कार करणे ही मुलभूत गोष्ट आहे. त्यासाठी साधना आणि मेहनत महत्वाची आहे. यावेळी कलाशिक्षकांच्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्‍न यांवर वक्त्यांनी आपले विचार  व्यक्त केले.
समाजात आज कलेविषयी तितकीशी जागरूकता आलेली नाही. दर्जेदार कलाकृतींविषयी रसिकही अनाभिज्ञ आहेत. नाशिकमध्ये चित्रकार शिवाजी तुपे वा.गो. कुलकर्णी, आनंद सोनार, अशोक ढिवरे, संजय साबळे अशा अनेक नव्या जुन्या चित्रकारांनी चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. आज शहरात कला, महाविद्यालये आहेत त्यातून अनेक चांगले चित्रकार  तयार होत आहेत. आणि आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत. या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ’आर्ट गॅलरी’ सुरु करण्याची गरज आहे.
त्यात नव्या चित्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रात्याक्षिके, कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. भारतीय व जागतिक कलाकृतींची माहिती व्हावी यासाठी एक म्युझियम (कला संग्रहालय) नाशिकमध्ये उभे करण्यास जनतेने पुढाकार घ्यावा. 

त्याचबरोबर कलाकृतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी लघुपट व कॉफी टेबल बुक करावेत त्यातून पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. नाशिकचे कलासंचित जपण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे..!



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment