Monday, 9 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकच्या रंगकर्मींचा प्रयास’


‘नम्रता कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेच्या कलाकारांना व तंत्रज्ञांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला निमित्त होते महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत ‘प्रयास’ या नाटकाला द्वितीय क्रमांंकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या निमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनाही गौरविण्यात आले. एकंदर या कार्यक्रमात नाटक आणि कलावंतांची नाट्यसाधना यावर विचारमंथनही झाले.
मी यात माझा नाटकाशी आलेला संबंध यावर मनोगत व्यक्त केले. कलाकार रंगमंचावर जी कला सादर करतो. त्यातून तो जीवनाशी संबंधित काहीतरी घटना सांगत असतो. तेच खरं तर त्याला जीवनातलं सत्य मांडायचं असतं. आणि तो पोटतिडकीने मांडत असतो. नाटक म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. असंख्य अनुभवांनी व्यापलेलं अवकाश आहे. ते समजून घेणं म्हणजेच ’नाट्य अवकाश’ होय. आजच्या टी.व्ही. चॅनेल्सच्या जमान्यात अनेक कलाकार येतात व मेहनत व कष्ट न करता या क्षेत्रातून दूर जातात. कलाकारांनी आवाज, उच्चार, शब्दोउच्चार, नाटकाचा विषय यावर अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर रंगभूमीची परंपरा समजून घेतली पाहिजे. ज्येष्ठ रंगकर्मीच्या प्रवास  जाणून घेतला पाहिजे. 

अभिनेते उपेंद्र दाते इतकी वर्ष नाट्य क्षेत्रात राहूनही त्यांना नवे शिकण्याची आस आहे, असे मनोगतात सांगितले. यावरूनच त्यांची बांधिलकी लक्षात येते. तोच विचार तरूण रंगकर्मींनी जोपासायला हवा. त्यातुन नाशिक रंगभुमीचे भविष्य उज्वल होईल. 




(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment