TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकमध्ये रुग्णांसाठी मायेचा आधार’
दुर्धर रोगाने पिडीत रुग्ण अखेरच्या काळात वेदना सहन करत असतात. उपचार करण्यासारखे काही नसल्याने रुग्णालयात ठेवण्याचा खर्च परवडणारा नसतो, हे लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मानवतेच्या दृष्टीने हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. नाशिकमध्ये रुग्णांसाठी प्रेमाने, तळमळीने संस्था अविरतपणे हे काम करत आहेत. ज्येष्ठ नागरीक, दारीद्रयाने पिडीत अनेक रुग्णांना मदतीची गरज असते. त्यांना अशा संस्था मदतीचा हात देतात. संवेदनशाीलता व माणूसकीच्या भावनेने हे काम करतात.
दिंडोरी रोड येथे क्षयरोगांच्या रुग्णांसाठी टीबी सॅनीटोरीयमद्वारे सेवा पुरविली जाते. रुग्णाला उपचाराबरोबरच संवादाची गरज असते आणि त्यातून त्याची इच्छाशक्ती प्रबळ होत असते. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत घेणार्या संस्था समाजासाठी आदर्श आहेत.
अशा संस्थांची संख्या वाढण्याची गरज असून त्यातून आपुलकीचा, माणूसकीचा कृतीशील संदेश जनतेपर्यंत पोहोचेल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment