TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकचा विकास व तरूण संशोधक’
नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या तृतीय वर्षे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून धावणारी इलेक्ट्रीक मोटर तयार केली. हे विद्यार्थी नाशिकमधील आहेत. तरूणांमधील संशोधन वृत्ती आणि त्यांना असलेले सामाजिक भान यातून व्यक्त होते. आज नाशिकचा चहूबाजूंनी वेगाने विस्तार होत आहे. पर्यावरण, वाहतूकीच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तरूणांनी केलेल्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
प्रदुषणमुक्त नाशिकसाठी सौर उर्जेवर चालणारी वाहने उपयुक्त आहेत.त्यातून पर्यावरणाविषयी प्रबोधन होण्यास मदत होईल.आज नाशिक शहरात आर्कीटेक्चर, कृषी, फार्मसी, इंजिनिअरींग अशी नामांकीत कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी प्रयोगशील अभ्यासूवृत्तीने ज्ञानसाधना करत आहेत. त्यातील वास्तूशास्त्राचे विद्यार्थी नाशिक शहराची रचना सुंदर असावी यासाठी प्रयोग करत आहेत व प्रतिकृती प्रदर्शनातून मांडत असतात. कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी नवनवीन पिकांचे उत्पन्न शेतकर्याला कसा आर्थिक लाभ मिळवून देतील याबाबत माहिती देत असतात.
नाशिकचा सर्वच क्षेत्रात विकास होण्याच्या दृष्टीने अनेकांचा हातभार लागत आहे त्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment