TOGETHER FOR NASHIK
‘गोदावरीच्या संवर्धनासाठी लोकजागर’
खळखळ वाहणारी गोदामाई आजूबाजूला हिरव्यागार झाडांचे नंदनवन असे दृश्य आज आपल्याला दिसत नाही. गोदावरीच्या पुन:सौंदर्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे. ती पुरेशी आहे का? याचे उत्तर सहसा नकारात्मकच येते. म्हणूनच नाशिकमधील ‘नमामि गोदा’ सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज शासकीय पातळीवरून गोदा स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. परंतू यात खर्या अर्थाने लोकसहभाग महत्त्वाचा आहे. असा विचार या कार्यक्रमात मांडला गेला. जेव्हा नागरीक ठरवतील की गोदावरी आम्ही अस्वच्छ करणार नाही. तेव्हाच गोदावरी प्रदुषणमुक्त होईल. त्यासाठी विविध सामाजिक संस्था याकामी पुढाकार घेत आहेत. तसेच युवा पिढी यासाठी योगदान देत असून त्यांनाही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
‘नमामि संस्थेच्या’ या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असे की यात गोदावरी संवर्धनासाठी काम करीत असलेल्या संस्थांचा ‘गोदासेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशा सन्मानातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. नमामितर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यांनी गोदावरी संवर्धन वारीचे आयोजन केले आहे. त्यातून गोदावरी नदी किनारी असलेल्या वस्त्या आणि गावांमध्ये जाऊन गोदावरी प्रदुषणासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.’
नाशिक शहराचे वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यटकांचा धार्मिक कार्याच्या निमित्ताने होणारा कचरा रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी लोकजागर करणे महत्त्वाचे आहे. त्यातून गोदेचे सौंदर्य वाढेल व संवर्धन होईल.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment