Saturday, 5 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिकच्या वाहतुक सुव्यवस्थेसाठी

नाशिकची वाढती लोकसंख्या व वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने ‘अर्बन मोबिलीटी सेल’ची निर्मिती केली आहे. यामुळे पादचारी, विनावाहन प्रवास करणारे आणि सायकलचा वापर करणारे नागरिक यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम योग्य तर्‍हेने पाळण्यासाठी यातून मार्गदर्शन मिळणार आहे. यात शासकीय विभागांबरोबरच वाहतुकीच्या शिस्तीसाठी कार्यरत असणार्‍या विविध सामाजिक संस्था यात सहभागी होत आहेत.
नाशिक शहरात आजकाल वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय सुचवण्यात येणार असून, त्यात पार्कींग सुविधा, झेब्रा क्रॉसिंग, वाहतुक बेट, गतिरोधक आदीविषयी विचार होईल. खरं तर यात नागरिकांनी स्वयंशिस्तीने पुढे येऊन या लोकचळवळीत योगदान दिले पाहिजे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक व्यवस्था यावरही विचारमंथन होण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी कृतीशील विचार गरजेचे आहे. शहराची वाहतुक सुव्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी अशा प्रयोगशीलतेतून वाहतुकीचे नवे उपाय समोर येतील व ते उपयुक्त ठरतील...!

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment