मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
नाशिक व बालकामगारांचे शिक्षण
बालकांना त्यांचे भावविश्व जपण्यासाठी, आनंदासाठी शाळा ही उपयुक्त भूमिका बजावत असते. त्यांच्या पंखांना आकाश लाभत असते. परंतू परिस्थितीच्या पुढे कोणाला जात येत नाही, असे म्हणतात. आर्थिक ओढाताणीमुळेही अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यावर पर्याय म्हणून मुलांचे बालकामगार म्हणून आयुष्य सुरु होते. अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘चाईल्डलाईन’ या संस्थेने नुकताच अनोखा उपक्रम राबवला व नवा आदर्श घालून दिला आहे निमित्त होते जागतिक बाल कामगार दिनाचे. ‘हाती नको काम हवे पुस्तकी ज्ञान’
‘काम नको-शिक्षण द्या’ अशी हाक या मुलांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारी होती.
बालवयात काम न करता, शिक्षण दिले पाहिजे. या विषयी या संस्थेतर्फे जनजागृती करण्यात आली.
कामगार वस्तीतील, झोपडपट्टीतील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलांना यामुळे शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. आणि त्यांना मुलभूत हक्क मिळणार आहे व त्यातून त्यांचा उत्कर्ष होणार आहे. समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी चाईल्ड लाईन सारख्या संस्थांचे कार्य म्हणूनच दिशादर्शक आहे. आणि नाशिकच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांना यातून प्रेरणा मिळणार आहे.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment