मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
योगसाधना व संगीत
मनाचे शरीराचे संतुलन योग्य राहण्यासाठी ‘योग साधना’ उपयुक्त आहे. हे सिद्ध झाले आहे योग हा केवळ व्यायाम नसून तंदूरस्त आरोग्याचा मंत्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात ताण-तणावात वाढ झाली आहे. त्यावर प्रभावी वापर म्हणजे योग करणे आहे. योगामुळे आपल्यातील सजगता वाढते आणि स्थिर मनासाठी आनंदी मनासाठी उपयुक्त अशी जीवनशैली ही आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेली भारतीय योगसाधना योग गुरूंनी ही देणगी जगाला, नव्या पिढीला अर्पण केली आहे. योग मुख्यत्वे करून ज्ञानयोग, भक्तीयोग, अष्टांग योग यातील एक भाग आहे.
जगभरात आयुर्वेदाबरोबरच संगीत, नृत्यासोबतच योग आवश्यक मानला जातो. धकाधकीच्या जीवनात जीवन जगण्याचा मार्ग योगाने शिकवला आहे. जागतिक योग दिनानिमित्त मनस्वास्थ्यासाठी सामूहिक योग साधना लोक करत आहे. मानवी समूहात स्वतः बरोबरच समाज स्वास्थासाठी योग महत्वाची भूमिका बजावतात. शारीरीक लाभाबरोबरच मानसिक शांती व अध्यात्मिक उन्नती हेही यातुन मिळणार आहे. नाशिक शहरात परिसरात शाळा, महाविद्यालयांमध्ये योग कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहेत. त्यातून नवा विचार मिळेल. आजच्या पिढीला याचे महत्व कळेल व त्यातून आरोग्यविषयक जनजागृती होण्यास मदत होईल.
संगीत व योगसाधना ह्या जीवनाच्या दोन मुलभूत बाजू आहेत. मन:शांती बरोबरच, स्वरांनी मनावर व्हायब्रेशन्स निर्माण होतात. भारतीय संगीताच्या विविधतेमुळे त्यातील नाविन्य कायमच आपल्याला खुणावते. म्हणूनच अनेक अध्यात्मिक सोहळ्यात, किर्तन परंपरेतही. संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात येतो आणि मानवी मनातील अमूर्तभाव जागृत होतो. कबीर, सुरदास यांची भजने ही मानवी जगण्याची अवस्था, नवा विचार प्रकट करतात. योगाच्या साथीने संगीताचा संस्कार उल्हासित बनवत असते आणि जीवन सुखकर बनवते. जागतिक योगदिन व संगीतदिवस हा योगायोगच आहे.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment