Monday, 13 August 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


जागतिक डावखुरे व नाशिक येथील चळवळ


जागतिक ‘लेफ्ट हॅण्डर्स’ दिनानिमित्त लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकच्या वतीने व्ही.एन.नाईक कॉलेज इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डावखुर्‍यांविषयी उपस्थितांनी विचार व्यक्त केले. आई आणि वडील दोघेही डावखुरे असल्यास मुलांचे डावखुरेपणाचे प्रमाण 26% असू शकते असे विज्ञान सांगते हे खरेदेखील ठरले आहे. डावखुर्‍या व्यक्तींची बौद्धिक पातळी तुलनेत उजव्या व्यक्तींपेक्षा जास्त असते. त्यांची कल्पनाशक्ती, संवेदनशीलता कलात्मकता ही बलस्थाने आहेत. त्यामुळे डावखुर्‍या मुलांकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. कुठलीही व्यक्ती ही त्यांच्या कर्तुत्वाने मोठी होते. डावखुर्‍याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत ते बर्‍यापैकी मोडीत निघाले आहेत. त्यामुळेच डावखुरेपणा ही अभिमानाची गोष्ट आहे. काळ आणि तंत्रज्ञान बदलल्यामुळे आज डावा, उजवा असा भेदभाव कमी झाला आहे. साध्या घटनेतून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते. असा मी माझा प्रवास कथन केला.
डावखुर्‍यांविषयी अशा प्रकारची विचारांची आदान प्रदान करणारी चळवळ नाशकात सुरू झाली आहे. त्यातून एकत्र येऊन विचारमंथन सुरू झाले आहे. ते निश्‍चितच दिशादर्शक ठरावे. 

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment