मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER
FOR NASHIK
गणपती
बाप्पाचे आगमन काही
दिवसात होत आहे.
वातावरण उत्साही होणार आहे. भावभक्तीचे
वातावरण फुलणार आहे. या
सार्या आनंदात
पर्यावरण संतुलन जलप्रदुषण अशा विषयांचा
कार्यकर्त्यांना बर्याच
वेळा विसरच पडतो.
परंतु या गोष्टी सामाजिक
भान जागृत ठेवण्यासाठी
पर्यावरण समतोलासाठी महत्वाच्या आहेत.
त्यासाठी
शाडू मातीपासून गणपती
तयार करण्याच्या विविध
कार्यशाळा अनेक संस्थांमार्फत, शाळांमध्ये आजकाल मोठ्या
प्रमाणावर आयोजित केल्या जात
आहेत व त्याला सकारात्मक प्रतिसाद
मिळत आहे.
त्याही
पुढे ‘ग्रीन गणेशा’
सारख्या प्रयोगातून निसर्गाचे रक्षण
करण्याचा प्रयत्न होत आहे. प्लॅस्टर
ऑफ पॅरीस गणेशमुर्तीमुळे
प्रदुषणाची समस्या भेडसवायला लागली
होती, त्यावर उपाय म्हणून
हा सामाजिक बदल
समोर येत आहे.
नाशिकमधील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्राच्या रद्दीपासून आकर्षक गणपती
तयार केले
आणि
एक प्रबोधनात्मक संदेश
दिला.
गणेशोत्सवात
ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी व्यापक चळवळ
उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी
गणेश मंडळाच्या समन्वयातून
हा मार्ग निघू
शकेल. थोडक्यात आपली
संस्कृती पर्यावरणपुरक आहे. म्हणूनच
आपले उत्सवही पर्यावरणपुरक असावेत,
हा विचार आचरणात
आणावा. बुद्धीनिष्ठ विचार आणि वैज्ञानिक
पद्धती यांची सांगड घालून
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत
करता येईल.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment