Thursday, 27 September 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

पर्यावरण संतुलनासाठी एक पाऊल पुढे पडावे म्हणून..

गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला, भक्तांसाठी ती आनंद पर्वणी होती. श्रीगणरायाचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. याहीवर्षी बर्‍याच गणेश मंडळांनी ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि आदर्श उपक्रमाचा विचार दिला असे म्हणावयास हरकत नाही. याचबरोबर नाशिकमधील काही सामाजिक संस्थांनी गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती. त्यामाध्यमातून जनजागृती केली. निर्माल्य नदीपात्रात टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक पिशव्या व रसायनांतील रंगामुळे जलप्रदुषण होते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. तसेच नदीपात्रातील जलवनस्पती, मासे यांच्यावर देखील मोठा परिणाम होऊन पर्यावरण साखळी बिघडते यावर उपाय म्हणून ‘नेचर क्लब ऑफ नाशिक’ या संस्थेतर्फे अभिनव उपक्रम राबविण्याची चळवळ सुरू केली. निर्माल्य नदीपात्रात न टाकता त्यापासून खत बनविता येते याची माहिती दिली आणि दीड टन निर्माल्य नाशिक महानगर पालिकेला दिले. त्याचबरोबर निर्माल्यापासून खत कसे तयार करता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे परसबागेतही खत निर्मिती करण्याचे मार्गदर्शनच मिळाले. प्रदुषण विरहीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भक्तांनी उचललेले हे प्रगतीशील पाऊल म्हणावे लागेल. पर्यावरण संवर्धनाचाच हा संदेश होता. काळानुरूप निसर्गाचा समतोल व प्रदुषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.

विश्वास जयदेव ठाकूर
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment