Friday, 8 March 2019

महिला सबलीकरण किती जवळ? किती दूर?

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

महिला सबलीकरण किती जवळ? किती दूर?


8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे महत्त्व लक्षात घेता जगभर महिलांनी केलेल्या प्रगती संदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. भारतात ग्रामीण भागात महिलांना याविषयीची क्वचितच माहिती असावी. इतकेच नव्हे तर शिक्षित महिलांनादेखील याबाबत काही जास्त माहिती असेलच असे नाही. सरकारी यंत्रणा तसेच काही संस्था व संघटनांच्या दृष्टीने या दिवसास महत्त्व असू शकते परंतु या दिवसाचा महिलांना काही लाभ झाला आहे की नाही? कर्तृत्ववान महिलांच्या प्रगती अथवा त्यांच्या उपलब्धीचा गौरव होतो, लक्ष केंद्रीत होते परंतु बाकी सदासर्वदा महिलांमधील असमानताच निदर्शनास येते. यातून खरोखर त्यांचा विकास साधला जातो का?
भारतात महिलांना अधिकार मिळावेत यादृष्टीने तसेच त्यांच्या सबलीकरणाचे कार्य तसे बरेच अगोदरपासून सुरू झालेले असून या कार्यात राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, इश्‍वरचंद्र विद्यासागर तसेच स्वामी विवेकानंद अशा महापुरुषांचा मोठा सहभाग होता त्यांच्या प्रयत्नातून महिलांमध्ये अन्याया विरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यांनी केलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी काळानुरूप आणखी नेते पुढे आले तसेच समाजसेवी संस्था पुढे येऊन कार्य पुढे चालविले गेले. हे जरी होत गेले असले आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने समाज जागृत असल्याचे दिसले. यादृष्टीने मोठमोठी कार्य होत असल्याचे दिसत असले तरी वस्तुस्थिती ही प्रत्यक्षात वेगळी दिसत आहे. भ्रुणहत्या, घरगुती हिंसा, बालविवाह यासारख्या घटनांना आळा घालण्याच्यादृष्टीने भक्कम पाऊले उचलू शकलो नाहीत, याबाबतीत सक्षम होऊ शकलो नाहीत. हुंडाबंदी कायद्याने जरी असली तरी यातील महिलांचा छळ, अडवणूक, मानसिक व शारीरिक छळाच्या घटना कमी होऊ शकल्या नाहीत. यावरून महिलांची स्थिती समाधानकारक नाही असे लक्षात येते.

जोपर्यंत पुरुष वर्ग महिलांकडे सन्मानाने पहात नाही, आपली मानसिकता, दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत महिलांच्या स्थितीत बदल होणे शक्य नाही.  खरे तर प्रत्येक दिवस हा महिला दिवस व्हावयास हवा जिथे महिलांचा सन्मान अबाधित राहील.

विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment