मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
दिव्यांग बांधवांच्या मतदान हक्कांसाठी...
निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचार मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. मतदानाचा हक्क सर्व घटकांना प्राप्त होण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी नवनवीन योजनाही राबवत आहे.
सर्वांनी मतदान करावे म्हणून विविध वृत्तपत्रे, चॅनेल्सवरून आवाहन करण्यात येत आहे. यात एका महत्त्वपूर्ण घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ती म्हणजे दिव्यांग बांधवांना मतदान करण्यासाठी घरपोच गाड्या, वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, पाणी व मदतनीसाची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना मतदान करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अनेक वर्षे आपल्या शारीरिक अडचणींमुळे, सुविधा नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहत होते. यामुळे मतदानाचा टक्का निश्चितच वाढणार आहे. समाजात दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी जागृती झाली आहे. अनेक सामाजिक संस्था त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आल्या आहेत आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे हे दिलासा देणारे आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये मी निवडणूक आयुक्तांना विनंतीपत्र लिहून सोयी-सुविधांबाबत मागणी केली होती. त्याला आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सुविधा दिल्या आहेत हे निश्चितच सर्वसामान्यांचे बळ वाढवणारे आहे. दिव्यांग बांधवांसाठी आणखी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करूयात.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment