अवकाश झेप व माणूसपणाची जाणीव
भारताने काल इतिहास घडवला अवकाशात शत्रुचा कृत्रिम उपग्रह नष्ट करण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. डी.आर.डी.ओ. ने तयार केलेल्या अटी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन भारत अवकाशात जगातील चौथी महाशक्ती ठरला आहे. भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील ही झेप अविस्मरणीय आहे.
विज्ञान माहिती तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आश्चर्यकारक आणि मान उंचावणारी आहे. भारतातील तरूण उद्योगधंदे, नोकरीच्या निमित्ताने जगभरात नाव कमवत आहेत, देशाचे नाव उज्वल करत आहेत. मूलभूत अभ्यासाची तयारी आणि मेहनत यातून अनेक तरूण देशविकासात हातभार लावत आहेत. संपन्न संस्कृतीचा वारसा घेऊन भारताची प्रगती विधायकतेकडे जात आहे. हा विचार इथे महत्त्वाचा ठरावा. विविध क्षेत्रातील माणसाची प्रगती ही नव्या संशोधनातील जाणीवांना कवेत घेणारी आहे हे जाणून घेऊन त्यचा विधायक वापर प्रत्येकाने करावा. विकासाची उंचावणारी झेप, माणूसकी व मातीशी नातं टिकवून ठेवणं हेही प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे हेही महत्त्वाचे ठरावे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:
Post a Comment