Tuesday, 2 April 2019

‘महिलांचे आयुष्य निरोगी रहावे म्हणून’

‘महिलांचे आयुष्य निरोगी रहावे म्हणून’

महिलां कुटुंबाच्या सर्वच आघाड्यांवर मेहनतीने, कष्टाने लढत असतात. आणि जबाबदारी पेलत असतात. हे करत असतांना त्यांचे बर्‍याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
महिलांनी आरोग्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे म्हणून ‘टीम इथ्री’च्यावतीने
‘वूमन ऑन व्हील्स राईडचे’ आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आरोग्याविषयी जनजागृतीचा संदेश दिला. महिलांचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती कुटुंबाकडे योग्य लक्ष देऊ शकते. पण ती जेव्हा आरोग्य समस्यांनी बेजार असेल तर त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. महिला सोशिक असल्याने दु:ख अंगावर काढण्याची त्यांंची सवय असते. त्यामुळे दुखणे विकोपाला जाऊ शकते. बदलत्या जीवन शैलीमुळे त्यांच्यात आजारांचे प्रकारही वाढत आहेत. त्यावर उपाय म्हणजे योग्य आहार, व्यायाम, योगासने करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अजूनही महिलांना योग्य आहार नसल्याने मुले कमी वजनाची, जन्माला येतात यासाठीच योग्य आहाराची समस्या आहेच. त्यावरही उपाय शोधणे गरजेचे आहे.
समाजातही महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता निर्माण होत आहे. आणि त्यातून नवी जीवन जाणीव निर्माण होत आहे हे मौलिक आहे.
महिलांच्या शिक्षणाच्या कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार अशा मुलभूत समस्यांवरही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून महिला सबलीकरणाचा, सक्षमतेचा विचार रूजण्यास मदत होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment