Thursday, 4 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

गोदावरीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे म्हणून



गोदावरी संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी अनेक संघटना सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. गोदावरी पुनर्जीवन व प्रदुषण मुक्तीसाठी हा लढा सुरू आहे आणि त्याला बर्‍यापैकी यश येत आहे.’ नमामी गोदा फाऊंडेशनतर्फे उच्च न्यायालयात 2012 मध्ये गोदावरी पुनर्जीवन जनदिन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने गोदावरी व तिच्या उप नद्यांच्या प्रदुषण मुक्तीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वेगाने गोदावरी संदर्भात प्रश्‍नांचा निपटारा होत आहे. या समितीकडे ऑनलाईन तक्रार केली तरी त्यावर तोडगा काढला जातो असे नागरिकांना अनुभवास येत आहे. याचबरोबर नाशिकमधील पर्यावरण जागृतीसाठी काम करणार्‍या तरुणींनी एकत्र येऊन गोदावरी प्रदुषणाबाबत अहवाल तयार केला आहे. मृण्मयी चौधरी-पेंडसे व शिल्पा डहाके या वास्तूविशारद तरुणींनी गोदावरीला पुनर्वैभव प्राप्त करून सौंदर्यबहाल करण्यासाठी नासर्डी नदीचा अभ्यास केला व त्याच्या आजूबाजूच्या जनजीवनाचा संवादातून वेध घेतला, त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. नदीला आलेल्या पुराचा इतिहास, नदी किनारी, हिरवे आच्छादन किती आहे? ‘अर्बन डायलॉग’ हे उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमातून गोदावरीची परिक्रमा करण्यात आली आणि त्यातून प्रदुषणाविषयी जनप्रबोधन झाले. गोदेचे महत्त्व जनमाणसात जबाबदारीने नोंदले गेले. अशा अनेक तरुण-तरुणींनी गोदेच्या वैभवाचं ध्येय हाती घेऊन नवा कृतीशील विचार देण्याचे काम हाती घेतले आहे, या चळवळीत आपणही सहभागी होऊ या.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment