मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
मनावर आनंदाचे फुल फुलण्यासाठी...
राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी नुकतान एक अनोखा जनजागृतीचा उपक्रम जनतेसाठी राबविला आणि त्याला जनतेनेही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर या अभियानाचा विषय होता ‘मानसिक स्वास्थ्य’. मानसोपचार तज्ज्ञांनी खेडोपाड्यात जाऊन गावकर्यांशी चर्चा करुन या आजाराविषयी माहिती दिली. शास्त्रीय पद्धतीने निरसन केले. नैराश्य किंवा उदासीनता ही भावना पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर ती व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे, असे समजावे असे लक्षण सांगितले. याप्रकारचे पेशंट खेडोपाड्यात दिवसेंदिवस वाढत आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यासाठी हे अभियान सुरु असल्याचे गावकर्यांना सांगितले आणि अनेक शेतकर्यांनी आपली व्यथाच डॉक्टरांसमोर मांडली. त्यात सोशल मिडीया, कुटुंब पद्धतीतील वाद, शेतीव्यवसायाला आलेली अवकळा हे विषय त्यांनी मोकळेपणाने कथन केले.
‘गाव तेथे मानसोपचार’ ही संकल्पना घेऊन मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. जीवनशैलीतील बदल, वाढती जीवघेणी स्पर्धा, विसंवाद यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यावर समुपदेशन होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. तरुण पिढीवर सोशल मिडीयाचे आक्रमण वाढत आहे आणि त्यातून त्यांचा जीवन व्यवहार ढासळत आहे. हा जसा महानगरातील प्रश्न आहे तोच प्रश्न खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. त्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment