Wednesday, 14 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

शिक्षण, महिला व समाज
आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षणानंतर ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण अर्धवट थांबते. मुलींना तर बारावीपर्यंतच शिक्षण मोफत देण्यात येते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ ही घोषणा बर्‍याचशा प्रमाणात प्रत्यक्षात आली आहे.
तरीही शिक्षणापासून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज आहे. महानगरपालिकेच्या  शाळांमधून झोपडपट्टीतील अनेक मुली चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. साक्षरतेमुळेच समाजातील, पर्यावरणातील बदलत्या प्रश्‍नांची जाणीव होते. म्हणूनच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाईं फुले यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली.
शिक्षण ही जीवनावर प्रभाव टाकणारी मुलभूत गोष्ट असून, भारतासमोर निरक्षरता ही मोठी समस्या होती. त्यात महिलांचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते, त्यावर मात करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियानाच्या मोहिमेमुळे मुलींच्या शिक्षणास प्रेरणा मिळाली आणि त्यातून नव्या जाणीवांचे अवकाश मिळाले.
महिलांच्या वाढत्या शिक्षणाच्या प्रसारामुळे देशातल्या विविध क्षेत्रात प्रगतीची दिशा मिळाली, हे वास्तव आहे.
आजच्या काळाचा विचार केल्यास अजूनही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न आहे. दळणवळणाच्या सुविधा आणि आर्थिक कारणांमुळेही शिक्षण घेण्यात अडचणी येतात आणि  त्यामुळेच माध्यमिक स्तरावर गळती लागते. या सुधारणा होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील  जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

शिक्षण हे पुढील समाज घडवत असते. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा विचार करतांना बदलत्या व आधुनिक समाजाचे  काही चित्र आहे का याचा विचार व्हावा. मुले-मुली पालक व शासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून नवे चित्र समोर येईल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment