15 मार्च जागतिक ग्राहक दिन
जागो ग्राहक जागो
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात वाढत्या व्यवसायात ग्राहक हा अविभाज्य घटक झाला आहे. ग्राहक हा व्यवसायाचा एकंदर बाजारपेठेचा केंद्रबिंदु आहे. आर्थिक उलाढाल आणि बदल यांचा ग्राहक हा महत्वपूर्ण साक्षीदार असतो. ग्राहकाचं झालेलं समाधान हे व्यवसायाला, उत्पादनाला उभारी आणि बळ देणारे असते.
जागतिक ग्राहक चळवळीच्या इतिहासात विसाव्या शतकात महत्वपूर्ण घडामोडी झाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेला व्यापार, औद्योगिक क्रांती आणि सुधारीत शिक्षण पद्धतीच्या प्रसारामुळे मुलभूत हक्कांची प्रत्येकाला जाणीव झाली. आणि ग्राहक हक्कांविषयी प्रश्न निर्माण झाले. याचाच भाग म्हणून प्रथम 1980 मध्ये हाँगकाँग येथे ‘कायदा व ग्राहक’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला. आणि त्यात ग्राहक हितावर चर्चा झाली.
ग्राहकांच्या बाजारपेठेतील हक्कांसाठी अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यामध्ये ग्राहकांना संरक्षणाचा अधिकार, माहिती मिळवण्याचा अधिकार, निवड करण्याचा अधिकार आणि ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेण्याचा अधिकार हे चार महत्वाचे अधिकार देण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघानेही ग्राहक चळवळीसाठी आठ हक्क दिले. सर्वांचा एकच हेतू आहे. शोषण मुक्ती ग्राहक यात कुठलाही भेद नाही. स्त्री- पुरुष, नोकरदार, मालक, आबालवृद्ध सगळेच ग्राहक हे सुत्र गुंफून ही चळवळ जगभर उभी राहिली आहे.
भारतातील जुनी ग्राहक संस्था म्हणजे ‘‘कन्झ्युमर्स गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया’’ या संस्थेची स्थापना लीला जोग, कमला सोहोनी सारख्या अभ्यासू महिलांनी केली. ग्राहक चळवळीतही आज महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे.
‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ हे जगातील 115 देशातील 240 ग्राहक संघटनांचे फेडरेशन असून, त्याच्या महासंचालक हेलन मॅक्लम ब्रिटीश महिला आहे. जगातील अनेक देशांमध्ये महिलांच्या पुढाकारातून या चळवळीला वेग आला आहे.
ग्राहकांच्या प्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी त्यांच्या हक्कासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ग्राहक संरक्षण कायदा, जनलोकपाल अशा अधिकारातून ग्राहकांमध्ये साक्षरता आली आहे. ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि त्याच्या तक्रारींचे सुलभतेने निवारण ही ग्राहकांची प्रथम गरज आहे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment