16 मार्च
राष्ट्रीय लसीकरण दिवस
लहान मुलांना होणार्या आजारांविरोधात लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा उपाय आहे. लसीकरण म्हणजे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे होय. हा कमी खर्चातील उत्तम उपक्रम आहे. गेल्या पाच दशकात लहान मुलांचा मृत्युदर 233 वरून 63 वर आला आहे (एक हजारापैकी). डिप्थेरिया, धर्नुवात, डांग्या खोकला, गोवर, हेपटायसीस ए, बी. कांजण्या अशा अनेक रोगांना लसीकरणामुळे प्रतिबंध करता येऊ शकतो.
आजकाल ग्रामिण भागातील लसीकरणाविषयी जनजागृती झाली असून, तेथील मुलांचे ही आरोग्य उत्तम राहण्यास मदतच झाली आहे. बाळाची काळजी व त्याचे आरोग्य याविषयीही पालकांमध्ये सजगता आली आहे. आदिवासी पाड्यांवर आरोग्य विभागातर्फे शिबीरांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. लसीकरण आणि शिक्षण या गोष्टींची उपयुक्तता आजकाल समाजाला कळायला लागली आहे. हे या मोहीमेचे यश म्हणावे लागेल.
बाळाचा विकास म्हणजे त्याची बुद्धी भावनेचा विकास होय. सामाजिक पैलूंच्या अंगाने विचार करायचा तर त्याचा कौशल्य आणि कार्याचा विकास होय. या घडामोडी त्याच्या मानसिक आणि वर्तुणूकीशी निगडीत असतात त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असते. क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, अ जीवनसत्व डोस अशा अनेक लसींतून बाळाचे आरोग्य तंदुरूस्त राहण्यासाठी मदतच होते व त्याचा आरोग्यविषयक भविष्यकाळ निरोगी असतो.
समाजातील सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज आहे. आणि त्यात समाजाने जाणीवपूर्वक पुढाकार घेणे उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे ठरावे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment