Saturday, 17 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

गुढीपाडव्यातून सामाजिक ऋणांची जपवणूक
गुढीपाडवा हिंदु पंचांगानुसार साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. नवीन व्यवसाय शुभकार्याची सुरुवात या दिवसापासून होते. मना-मनातील आनंदाला यातून उधाण येते. पावित्र्य आणि मंगलतेचा हा उत्सव असतो. नव्या जाणीवेतून नव्या आकांक्षा घेऊन गुढीपाडव्याच्या आनंद एकमेकांमध्ये वाटला जातो. राजा शालीवाहनाच्या विजयाचे प्रतिक म्हणून या सणाचे महत्व आहे. इतिहासाप्रमाणे गुढी भगवान रामाच्या विजयाचे आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परतल्यामुळे आनंदाचे प्रतिक आहे. चौदा वर्षाचा वनवास संपल्यानंतर रामाच्या राज्याभिषेकाच्यावेळी आनंद म्हणून साजरा केला गेलेला सण म्हणजे गुढीपाडवा...
सुख- समृद्धीचा अनोखा मिलाफ गुढीपाडव्याच्या निमित्ताने दारी येतो. पराक्रमाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुढी उभारली जाते.
मानवी नात्यांना, समाजाला जोडण्याचे काम भारतीय सणांमध्ये आहे. विविध भाषा, संस्कृती, परंपरा यांची सांगड किती घट्ट आहे, याची प्रचितीच या आनंदोत्सवातून येते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणार्‍या स्वागतयात्रेतून सर्व समाजातील जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि सांस्कृतिक व सामाजिक एकोपा राखण्याचा संदेश देतात. मनामनात चैतन्य फुलवण्याचे काम यातूनच होत असते. सकारात्मक, विधायक कार्याची प्रेरणा आणि त्याचा उपयोग करण्याची प्रेरणा यातून मिळत असते.
ढोलपथकातून ‘एक सुर एक ताल’ हा संदेश दिला जातो. सामाजिक सदभावनेतून जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना यातून केली जाते. चित्ररथ, नृत्य, लेझीम पथके, यांतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. आजकाल स्वागतयात्रेतून पर्यावरण रक्षण, लेक वाचवा स्वच्छता अभियान, शिक्षण आरोग्य अशा विषयांवर संदेश दिला जातो. अशा कार्यक्रमातून समाजमन बदलण्यासाठी लोकसेवेचा नवा विचार दिला जातो व तोच विचार नव्या पिढीसाढी मोलाचा असतो.  


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment