Monday, 19 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...


‘लोककलांचे जतन’
महाराष्ट्र समृद्ध कला-परंपरांनी नटलेला आहे. अनेक पारंपारिक कला अजूनही टिकून आहेत. ग्रामीण भागात जत्रांच्या निमित्ताने उत्सवांच्या निमित्ताने कला सादर केल्या जातात. अनेक जाती-जमातींमध्ये लोकनृत्य ही स्वतंत्र ओळख आहे. कोळी नृत्य तसेच नंदुरबार, नाशिक, जव्हार, मोखाडा आदी परिसरातील लोकजीवनातील चालीरिती घटना यांचे अप्रतिम दर्शन लोकनृत्यातून केले जाते. यातून समाजजीवनाचा पैलू समोर येतो. विदर्भातही दंडार सारख्या नृत्यप्रकारातून विविध प्रसंग समोर येतात.
कोकणात काळी, चेऊली, बाल्या तसेच शेतकरी नृत्य, धनगरी नृत्य अशा विविध नृत्यातून लोकदर्शन होते.
सुरगाणा, पेठ या आदिवासी भागात कायमच लोकउत्सव साजरे होत असतात. सुगीच्या दिवसात जत्रा, मेळे  हे त्यांचे काही महत्वाचे उत्सव ते सादर करत असलेली नृत्येही वाद्यांच्या नावाने परिचित असतात.  तारफा, बोहाडा, ढोल नाच अशी नांवे होत.
आदिवासींमध्ये डोंगर माथ्यावर भाताची किंवा नागलीची लागवड केली जाते आणि पिकाचे चांगले उत्पन्न भरभरून आले की आनंदोत्सव म्हणून नृत्य केले जाते. होळीच्या सणाच्या दिवशीही नृत्याचा फेर धरला जातो. पारंपारिक सणांचे महत्व आणि त्यातून मिळणारा आनंद यांची सांगड अनेक लोककला, लोकपरंपरांमध्ये आहे.

वासुदेव, बहुरूपी, गोंधळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, पोवाडा, भारूड, किर्तन अशा कला प्रकारांतून सांस्कृतिक, सामाजिक समन्वय साधला जातो. या कलांचे जतन व संवर्धन होण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन पातळीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, त्यातून नवी पिढीही याकडे आकर्षित होईल व प्रसार व प्रचार होण्यास तसेच लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापन्याची गरज आहे. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment