‘प्रतिभावंत नाटककार वसंतराव कानेटकर’
मराठी व हिंदी रंगभूमीला, चित्रपटाला नवा आयाम व नाट्यभाषा देणारे नाशिकचे भुमिपुत्र थोर नाटककार वसंतराव कानेटकर यांची आज 98 वी जयंती. रायगडाला जेव्हा जाग येते, वेड्याचे घर उन्हात, हिमालयाची सावली, प्रेमा तुझा रंग कसा?, अश्रृंची झाली फुले, अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी रंगभूमीला बहाल केली. व्यावसायिक, समांतर, प्रायोगिक रंगभूमीला नवी ओळख दिली. मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळविण्यात कानेटकरांचे मोठे योगदान आहे.नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयात इंग्रजीचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून कानेटकरांचा लौकीक होता. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी लेखनाची, वाचनाची गोडी लावली. त्यांनी कथा, कादंबरी, लेखनही केले पण खरी ओळख निर्माण केली ती नाटककार म्हणूनच.
नाटक कौशल्यावर उत्तम पकड, नाट्य पकडण्याचे उत्तम कौशल्य, नाटकातील नाट्य घडविण्याची शैली, उत्कटता व अलंकारिक भाषेचा प्रभावी वापर त्यांनी केला. आणि मराठी रंगभूमीला श्रीमंती बहाल केली. मराठीतील सन्मानीय विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, इतिहासकार यांच्या कार्यावर कानेटकरांनी नाटके लिहिली.
त्यात इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, बाबा आमटे, हिराबाई पेडणेकर, महर्षी कर्वे अशा व्यक्तीमत्वांचा समावेश आहे.
माझे ज्येष्ठ बंधू राजा ठाकूर यांच्या ‘एकदा काय झालं’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून कानेटकरांना विनंती केली. त्या दिवशी नेमका गुढीपाडवा होता. व कानेटकरांचा पुर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता. परंतू राजाभाऊंनी त्यांना गळ घातली आणि म्हणाले की तुम्ही तारीख द्याल तो गुढीपाडवा आणि लगेच कानेटकरांनी नजीकची तारीख दिली आणि शानदार प्रकाशन समारंभ पार पडला. हा स्नेह अनेक वर्ष ठाकूर परिवाराशी कानेटकरांचा टिकून होता.
मैत्री जपणे आणि टिकविणे ही त्यांची खासीयत होती. आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये (मंगळवार, 20 मार्च 2018) वसंतरावांच्या उचित स्मारकाविषयी मत नोंदवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन अशा महान नाटककाराच्या स्मृती जपाव्यात तसेच मौलिक नाट्यकृतींचा ठेवा जपावा.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment