‘नाशिकची वाहतूक आणि जनप्रबोधन’
राज्यातील पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्ता अपघातांचा अहवाल नुकताच मुंबई वाहतुक शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांनी प्रसिद्ध केला असून त्यात नाशिक आयुक्तालय क्षेत्रातील अपघातांच्या संख्येत अनेक शहरांच्या तुलनेत गेल्या वर्षापेक्षा 39 टक्क्यांनी घट झाली आहे. नाशिक पोलिसांनी राबवलेली हेल्मेट सक्ती, जनजागृती उपक्रम आणि त्यात नाशिककरांचा सहभाग यामुळे हे शक्य झाले आहे. नाशिकमध्ये 2017 मध्ये 158 अपघातात 171 जणांचा मृत्यु झाला होता. 2016 मध्ये 1031 अपघातात 213 जणांना जीव गमवावा लागला होता.अपघात रोखण्यासाठी प्रबोधनासाठी शाळा, महाविद्यालये, औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन पोलिस अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. शाळांमध्ये ’छोटा पोलीस’ सोमवारी ’नो हॉर्न झेब्रा क्रॉसिंग’, हेल्मेट न वापरणार्याला गुलाबपुष्प देणे असे अभिनव उपक्रम राबविले व त्याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिस हा जनतेचा मित्र असतो.
जनतेला सोबत घेऊन विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. वाहतुक सुरक्षेसाठी ङ्कनाशिक फर्स्टङ्ख या संस्थेनेही यासाठी जनप्रबोधन चळवळ उभारली आहे. त्यासाठी नाशिक पोलिस, प्रादेशिक परिवहन यांचे सहकार्य लाभले आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांबरोबरच 18 ते 25 वयोगटातील वाहन चालकांना वाहतुकीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. तसेच रिक्षा, बस व विद्यार्थी वाहतुक करणार्या बस चालकांसाठी प्रशिक्षण वर्ग व अभ्यासक्रम राबवले जातात.
नाशिक शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण, पार्कींगची सुविधा, शहर बससेवा यांचा नव्याने अभ्यास करून उपाययोजना तज्ज्ञांनी कराव्यात. तसेच नवा वाहतुक आराखडा तयार करण्यासाठी नागरीकांनी आपल्या सूचना मांडाव्यात. जेणेकरून सुरक्षित वाहतुकीचा नवा विचार रूजेल.
नाशिक शहराचा वाढता विस्तार बघता वाहतुकीचे नियोजन करणेही जिकरीचे झाले आहे. त्यात सामाजिक जागृतीतून नवी जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होत आहे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यातून नाशिकची ओळख सुसंस्कृत होण्यास व आदर्श शहरासाठी पूरकच ठरणार आहे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment