Friday, 23 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिक घडविण्यासाठी आपण सारे एकत्र येऊ...’

‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे नाशिकच्या विविध क्षेत्राच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्योग-व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असतांना काही मुद्दयांवर चर्चा झाली. यात सर्वसामान्य नागरिकांनी जबाबदारी म्हणून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे नमुद करण्यात आले. प्रामुख्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे. कचरा घंटागाडीत टाकणे, प्रदुषण रोखणे इत्यादी बाबी होत.
गोदावरी स्वच्छता अभियानात नागरिकांनी कचरा न होऊ देण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. गोदेचे सौंदर्यं पावित्र्य जपण्यासाठी सामाजिक हित म्हणून बघावे. गोदावरीचे सौंदर्य अबाधित राहील याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिक हे पर्यटनस्थळ असल्याने त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत असते.
तोच धागा घेऊन गोदाकिनारी परिसरात थ्री स्टार हॉटेल्स रिसोर्टची निर्मितीही होऊ शकते. यासंदर्भात उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नाशिकच्या सौंदर्यात नीटनेटकेपण आणण्यात, अतिक्रमणमुक्त करण्यावर सूचना मांडण्यात आल्या. नाशिकची विकासात्मक वाटचालही एकत्रीकरणातून विचारमंथनातून झाल्यास नाशिकचे नवे रूप साकारण्यास निश्‍चितच मदतच होणार आहे.

नाशिक आज ‘एज्युकेशनल हब’ म्हणून नावारूपास येत आहे. अनेक महत्वाच्या शिक्षणसंस्था, अभिनत विद्यापीठे स्थापन झाली आहेत. याचबरोबरच कामगार वस्तीतील झोपडपट्टीतील मुलामुलींना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा कंपन्यांनी दत्तक घेणे, असे काही उपाय आहेत. सर्वांपर्यंत शिक्षणाचा विचारही यातून पोहोचण्यास मदत होईल. म्हणूनच नाशिकसाठी आपण सारे एकत्र येऊ.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment