TOGETHER FOR NASHIK
‘दिव्यांगांचे अनोखे साहित्य सम्मेलन’
7वे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य सम्मेलन विश्वास लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या सम्मेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या कला-साहित्य विश्वाच्या कक्षा रूंदावणारे हे संमेलन आहे. दिव्यांग बांधवांनी अनेक दर्जेदार कवितासंग्रह, कथासंग्रह, ललितलेखन साहित्य विश्वाला देऊन साहित्यविश्व समृद्ध केले आहे.अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ या अपंग महिला समीक्षा अनुवाद, कथा, स्तंभलेखनात फार मोठे काम करत आहे. कवी प्रा. अशोक थोरात, कवी यशवंत पुलाटे, गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत, दिवंगत गझलकार नाना बेरगुडे, अशी असंख्य नावे आहेत, ज्याचे साहित्य कर्तृत्व मराठी साहित्य विश्वात फार मोठे आहे.
अपंगत्त्व आणि अपंगत्त्वाकडं पाहण्याचा दृष्टिकोन याबाबत समाजामध्ये सजगता निर्माण करण्यात विविध प्रकारची माध्यमं आणि साहित्य महत्त्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. प्रत्यक्षात या अनुषंगाने काही घडतं आहे का? घडत असेल तर ते योग्य प्रकारे घडत आहे का? अपंगांचे साहित्य म्हणून साहित्याचा वेगळा प्रवाह मानणं, त्याची वेगळी संमेलने असणं योग्य आहे का? याबाबत विचारमंथन होणे ही काळाची गरज आहे.
भाषा व अनुभवाच्या मिश्रणातून दमदार अभिव्यक्ती निर्माण होते. दिव्यांग साहित्य संमेलनातून नव्या जाणिवांचे, भाषिक अवकाशाचे चित्र दिसते आहे. आपल्या लेखनातून समाजात आनंद निर्माण करा, नवा विचार द्या. तेच साहित्य निर्मितीचे खरे मूल्य आहे. ह्या मूल्यांची जोपासना दिव्यांग करत असतात.
मराठी साहित्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अस्सल प्रतिभेचे लेखक, कवी, दिव्यांग साहित्य संमेलनातून आले आहेत. मनाच्या जाणिवेतून आलेला अविष्कार वास्तवाची जाणीव करून देणार असतो. ते सारं यांच्या लेखनात आलं आहे. भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या साहित्यकृती आदर्श आहेत.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment