TOGETHER FOR NASHIK
‘चित्रपट उद्योगासाठी संपन्न नाशिक...’
नाशकात नुकताच 10 वा नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल (निफ 2018) संपन्न झाला. यात चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लेखक, तंत्रज्ञ, अभिनेते उपस्थित होते. यात चित्रपटविषयक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले व त्यावर विचारमंथनही झाले.चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिक ही जन्मभूमी आज जगात चित्रपट क्षेत्रात जे बदल झाले आहेत. त्याची रूजवात दादासाहेबांनी केली. समाज प्रबोधनासाठी प्रश्न मांडण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी दाखवले आणि प्रत्यक्षात आणले.
नाशिकच्या कला-संस्कृतीच्या विकासात अनेक थोर कलावंतांनी योगदान दिले आहे. कलाक्षेत्रात अभिरूची घडवण्याचे काम केले आहे.
दादासाहेब फाळके यांच्या समृद्ध नाशिकमधील अनेक कलावंत कलेचा हा वारसा जपत आहेत. मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी नावलौकीक संपादन केला आहे. आशयप्रधान व तांत्रिक अंगाने समृद्ध सिनेमा नाशिककरांनी निर्माण केला आहे. व योगदानाबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
चित्रपट निर्मितीसाठी शासनाने दादासाहेब फाळके चित्रसृष्टी तयार करण्यासंदर्भात चर्चा केली आहे व त्यासाठी पावले उचलली आहेत. त्याला मूर्तरूप येईलच.
आधुनिक चित्रपटनगरी नाशकात स्थापन झाल्यास नवनवीन चित्रपटनिर्मिती होण्यास मदत होईल. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल व सिनेमासंबंधी तांत्रिक माध्यमांविषयी मार्गदर्शन करणार्या संस्था निर्माण होतील. त्यातून नवी पिढी या माध्यमांकडे आकर्षित होईल. अनेक निर्माते चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करतील व त्यातून पर्यटनस्थळ विकसीत होण्यास मदत होईल.
नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातील स्थळे शुटींगसाठी विकसित करता येतील व त्यातून हॉटेल रिसोर्टचा व्यवसाय वाढीस लागण्यास उपयुक्त ठरेल. अनेक उमेदीने सकस लिहिणारे लेखक नाशिकमध्ये आहेत. त्यांच्यासाठी चित्रपटासाठी पटकथा, गीतलेखन, कार्यशाळांचे आयोजन केल्यास आशयप्रधान सिनेमांसाठी पूरक ठरणार आहे. म्हणूनच मुंबईला चित्रपट उद्योगाला पर्याय नाशिक निश्चित ठरू शकेल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment