TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकची रंगभूमी सशक्त व्हावी म्हणून...’
मराठी, हिंदी रंगभूमीच्या विकासात नाशिककर कलावंतांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. समांतर प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांनी आपली मोहर उमटवली आहे. नाशिकच्या रंगकर्मींमध्ये टॅलेन्ट आहे. त्यांना भारतीय व आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
प्रायोगिक रंगभूमीसाठी नाशिकमध्ये नवे प्रयोग सादर होण्याची गरज आहे. राज्य नाट्य स्पर्धेत नाशिककर कलावंत अनेक महत्वाची नाटके सादर करतात त्यातील पहिल्या पाच नाटकांचा महोत्सव सादर व्हावा जेणेकरून कलावंतांना आत्मविश्वास मिळेल. तसेच या नाटकांवर परिसंंवादात्मक चर्चा व्हावी व नाटकाच्या लेखन, तांत्रिक माध्यमे यासंबंधी मार्गदर्शन व्हावे.
हौशी तरूण रंगकर्मींसाठी संस्थांनी मोफत रंगमंच उपलब्ध करून द्यावा व त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करावेत. नाट्य परिषदेमार्फत कलावंत, लेखक यांच्यासाठी मोफत कार्यशाळा घ्याव्यात. जेणेकरून त्यांना योग्य दिशा मिळेल.
रसिकांची अभिरूची घडवण्यासाठी आशयप्रधान नाटके सातत्याने सादर व्हावीत व त्यासाठी ‘लोकरंगमंच’ सारखे उपक्रम सुरु व्हावेत.
‘बालरंगभूमीच्या’ विकासासाठी अजूनही अनास्था आहे. त्यासाठी शाळांमध्ये जाऊन रंगकर्मीनी निवडक विद्यार्थ्यांना घेऊन बालनाट्ये बसवून नाट्यविषयक जाणीव निर्माण करावी मुलांच्या सृजनशक्तीला, अष्टपैलूत्वाला याचा उपयोग होईल.
नाशिकच्या रंगभूमीला अशा प्रयत्नातून नवे भान व उर्जितावस्था प्राप्त होईल व रंगभूमी सशक्त होईल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment