Wednesday, 28 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...



TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकची वाहतुक सुरक्षा आणि प्रशिक्षण...’


नाशिकमधील वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक संस्था प्रबोधन करत असतात व मार्गदर्शन करत असतात. यातीलच एक जनतेला वाहतुकीच्या नियमांची कृतीशील जाणीव करून देण्यासाठी चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क, सामाजिक जाणीवेतून काम करत आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. तो म्हणजे दुचाकी चालकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा. अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क व  हिरो मोटार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमात प्रामुख्याने तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने वाहन चालवण्याचे नेमके फायदे यातून मान्यवर सांगणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत. आजकाल 70 टक्याहून अधिक अपघात हे दुचाकी चालकांकडून होतात आणि यात सर्वाधिक प्रमाण दुचाकी चालवणार्‍या तरूणांचे आहे. यातून सुरक्षित वाहन चालवण्याचे फायदे त्यांना कळणार आहेत.  काही दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार वाहतूक नियमांचे पालन व रस्ता सुरक्षितेत नाशिक महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. 
नाशिकमधील वाढती लोकसंख्या आणि रस्ते रूंदीकरणाचा अभाव यामुळे वाहतूकीत अडचणी येतात. त्यासाठी पोलीसांतर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात व त्यातून जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या व शालेय बसेसचा जास्त वापर यामुळे वेळेत आणि सुरक्षित वाहतूक होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दिशादर्शक ठरावेत आणि वाहतुक सुरक्षितेविषयी नवी जाणिव निर्माण करणारेही ठरावेत.



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment