Friday, 30 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिकचे ‘एज्युकेशन हब’ व मुक्त शिक्षणाचा विचार


शिक्षणासारख्या गतीमानतेने बदलणार्‍या क्षेत्रात प्रयोगशीलता येत आहे. त्यातून नवनवीन शैक्षणिक संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत. आधुनिक शिक्षणप्रणालीत बदलाचे फायदेही दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय स्तरावरील मुक्त शिक्षण हा विषय सध्या चर्चेत आहे. या विषयाचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्र टाईम्स नाशिकतर्फे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या विषयीच्या परिणाम व फायदे यांची चर्चा झाली.
झोपडपट्टी, कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. ‘मुक्त शिक्षण’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. त्यांना शिक्षणाची संधी मिळेल. समाजातील निरक्षरतेचे प्रमाण घटवण्यासाठी याचा उपयोग होईल.
शिक्षणापासून वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी हा महत्त्वाचा विचारआहे. संपन्न आणि समृद्ध व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षण हा प्रभावी घटक आहे.

पारंपारिक शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या अनेकांना हा निर्णय धक्कादायक असला तरी शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी पूरक आहे. नाशिक आज ‘एज्युकेशन हब’ म्हणून नावारूपाला येत असतांना असे प्रयोग होणे ही काळाची गरज आहे. शिक्षणातून मिळणारा आत्मविश्‍वास आणि लवचिकता यांचा समन्वय साधून शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा विचार रूजण्यास यामुळे निश्‍चितच मदत होणार आहे. या शिक्षणातील अभ्यासक्रमाची रचनाही वैविध्यपूर्ण असणार आहे. व्याप्ती, उद्दीष्टे, मूल्यमापन आदींशी निगडीत गोष्टी यामध्ये असतील. पारंपारिक शिक्षणातील आवश्यक संवाद आणि कौशल्य संपादित करून स्वतःचा व्यवसाय टाकण्याची क्षमता यात असेल. यातून बेरोजगारी कमी होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. नाशिकच्या शिक्षण क्षेत्राच्या विकासात अशा संकल्पना कक्षा रूंदावणार्‍या ठरणार आहेत. त्यासाठी नाशिकमधील शिक्षणक्षेत्रातील जाणकार तज्ज्ञांनी यावर विचारमंथन करावे. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment