Saturday, 31 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

तंबाखूमुक्त नाशिक


तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. भारतात तंबाखू खाणार्‍यांचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आहे. ही सवय लहान मुले व तरूणांमध्ये वेगाने फैलावत आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रबोधनात्मक जाणिवेतून नाशिकमध्ये ‘जॉईन द चेंज’ या अभिनव चळवळीची सुरूवात झाली आहे.
नाशिकच्या विकासात आरोग्याचेही तितकेच महत्त्व आहे. एच.सी.जी. मानवता हॉस्पिटलच्या सहकार्याने ‘तंबाखू मुक्त नाशिक’ हा उपक्रम घेण्यात आला आहे. तंबाखू विरोधात कायदा येऊनही अजून समाजात जाणीव व जागृती आलेली नाही. यासाठी सामाजिक संस्था व जनतेने पुढे येण्याची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात येऊनही काही प्रमाणात विक्री होत असते त्यांवर कडक निर्बंध रोखणे महत्त्वाचे ठरावे.
भारतात कर्करोगाचे वाढते प्रमाण बघता सर्वांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. तंबाखूचे व्यसन असलेले ऐंशी टक्के लोक हे अल्प उत्पन्न असलेल्या विकसनशील देशात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये तरूणांमध्ये व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यासाठी तंबाखूमुक्त अभियानाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनासंदर्भात सर्वेक्षणानुसार 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 35% व्यक्ती विविध माध्यमातून तंबाखुचे सेवन करतात. ग्रामीण व शहरी भागात याचे वाढते प्रमाण आहे.

पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य अशा उपक्रमांतून यांवर प्रबोधनात्मक विचार पोहोचू शकतो. तसेच व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरूणांचे समुपदेशन करून त्यातून त्यांना बाहेर काढता येऊ शकते. यासाठी कुटुंबाने, समाजाने जबाबदारीने पुढे यायला हवे. सर्वांच्या प्रयत्नांतून ‘तंबाखूमुक्त’ नाशिक होण्यास निश्‍चितच मदत होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment