TOGETHER FOR NASHIK
‘प्लास्टिकमुक्त नाशिक’
पर्यावरण संवर्धन व्हावे, यादृष्टीने प्लास्टीक बंदी हा विषय सध्या चर्चेत आहेत. प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्याने एक मोठे संकट उभे राहिले आहे. केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 1.2 टन प्लास्टीकच्या उत्पादनांचा वापर होतो. त्यातून 950 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. इतक्या प्रचंड प्रमाणात प्रदुषण करणार्या प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी शासन आणि संस्था पुढे सरसावल्या आहेत.
‘सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक’ अशी संकल्पना घेऊन नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु आहे. यानिमित्ताने नाशिकच्या सार्वजनिक स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आला आहे. जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी यात जनतेचाच पुढाकार महत्वाचा आहे.प्लास्टिकबंदी करण्यासाठी प्रथमतः विक्रीवर बंदी आणावी. व प्रबोधनात्मक जाणीवेतून मेळावे घ्यावेत. कागदापासून, कापडापासून टाकावू ते टिकावू पिशव्या तयार करण्याच्या मोफत कार्यशाळा घ्याव्यात. विविध मोहिमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांना प्लास्टिक बंदीचं महत्व सांगावे. प्लास्टिकमुक्ती यशस्वी करण्यासाठी केनिया देशाने बाजी मारली आहे.तेथील जनतेने व प्रशासनाने यात पुढाकार घेतला व प्रदुषण मुक्तीचा कृतीशील विचार दिला आहे.
प्लास्टिकचे वैज्ञानिकदृष्टया काय तोटे आहेत त्याचा आरोग्यावर, पर्यावरणावर निसर्गावर काय परिणाम होतो, हे सर्वांना कळले तर ‘प्लास्टिकमुक्त नाशिक’ होण्यास नक्की मदतच होईल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
Very true
ReplyDelete