नाशिकच्या वाहतुकीचे नियोजन
नाशिक शहराची झपाट्याने व वेगाने वाढ होत असून, वाढती वाहनांची संख्या, उद्योग व्यवसायाची गतिमानता, नोकरी धंदा करणारा वर्ग यामुळे नाशिकमधील वाहतुकीच्या प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा काढणे शक्य होणार आहे. लोकसहभाग आणि प्रशासनाची मदत घेऊन यांवर निश्चित उपाय निघू शकतो, यासाठी जनतेने स्वयंशिस्त बाळगणेही गरजेचे आहे.
सुरक्षित सुलभ प्रवासासाठी प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याची गरज असून, यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील यंत्रणानी परस्परांमध्ये स्पर्धेेेऐवजी सहकार्याची भावना जोपासण्याची गरज आहे.
नाशिकची मेट्रोसिटीकडे वेगाने वाढ होत असून, या तुलनेत वाहतुकीच्या नियोजनातही बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिक शहराच्या गरजा वाहतुक व्यवस्थापन यांची सांगड घालणे महत्वाचे आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी अधिकारी, निवृत्त अधिकारी यांनी आपल्या अनुभवातून निर्णय घेऊन सुचना करणे वाहतुकीच्या शिस्तीसाठी पुरकच ठरेल. नाशिक महानगर पालिकेतर्फे वाहनतळांची निर्मिती केल्यास पार्कींगसाठी मार्ग निघण्यास मदत होऊ शकते.
त्याचबरोबर रिक्षा वाहतुकीच्या नियंत्रणासाठी सामोपचाराने मार्ग काढणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या सर्व पर्यायांचे नियमन एका छताखाली असावे. सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक यांच्यातील समन्वय साधण्यासंदर्भात विचारमंथन व्हावे.
सार्वजनिक व्यवस्था, रिक्षा, टॅक्सी, यासारख्या शासकीय नियम असलेल्या व्यवस्थांबाबत प्रवाशांच्या अडीअडचणी समजून घेणे नियोजनाबाबत महत्वाचे ठरेल.
द्वारका, सी.बी.एस., त्र्यंबकरोड, शरणपूर रोड, कॉलेज रोड या ठिकाणी प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी होते त्यावर वाहतुकीचे मार्ग बदलण्यासाठी नागरिकांशी चर्चा व्हावी.
वाहतुकीच्या नियोजनाबरोबरच प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरण संतुलनाचा समतोल राखण्यासाठी लोकजागरातूनच मार्ग काढावा. नाशिकच्या विकासात वाहतुक व्यवस्था ही कळीचा मुद्दा आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी संघटीत प्रयत्नांची गरज आहे.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष-विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment