Tuesday, 3 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकचे कचरा व्यवस्थापन’

  नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होत आहे. घनकचर्‍याची विल्हेवाट योग्य लावली जात असल्याने प्रदुषणाच्या समस्या तशा कमी निर्माण होत आहेत. शहरांमधून रोज जमा होणारा कचरा खत, कांडी, कोळसा ‘प्लास्टीक कचर्‍यापासून ‘फर्नेस ऑईल’ तयार करणे अशा प्रकल्पांसाठी वापरला जात आहे.
नाशिकमध्ये कॉलनी-कॉलनीत घंटागाडीमार्फत कचरा जमा केला जातो आणि त्याचे संकलन करून खत निर्मिती प्रकल्पासाठी दिला जातो. कचरा निर्मुलनासाठी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे नियंत्रण राखण्यात मदत होते.
‘स्मार्ट नाशिक’कडे वाटचाल करून असतांना शहराच्या आरोग्याचा प्रश्‍नही तितकाच महत्त्वाचा आहे. नाशिकची स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. पूर्वी कचरा संकलन हे आडगांवनाका परिसरात होत होते. परंतू नागरी वस्ती वाढल्यानंतर विल्होळीला कचरा आगार हलवण्यात आले. सध्यातरी 60-70 टक्के कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. इतर शहरांपेक्षा नाशिक याबाबत अग्रेसर आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी लहान-लहान प्रकल्प उभे करून त्यातून खत निर्मिती प्रकल्प उभे राहू शकतात. उद्योगधंद्यांतून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात घातक रसायने असतात, ते नष्ट करण्याची सक्ती उद्योजकांवर हवी.

वैद्यकीय कामानंतर उरलेल्या कचर्‍याचे निर्जंतुकरण करून त्याची विल्हेवाट लावावी. नाशिकचे वाढते नागरीकरण व शुद्ध हवा, निरोगी आरोग्याचा समतोल राखण्यासाठी कचरा व्यवस्थापन महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

1 comment: