Thursday, 5 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...


TOGETHER FOR NASHIK
‘हरीत नाशिक’

नाशिकचे पर्यावरण संतुलन उत्तम रहावे. हवा शुद्ध खेळती रहावी. प्रदुषणमुक्त नाशिक व्हावे, यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था काम करत असतात. याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये हरीतपट्टा मोठ्या प्रमाणावर उभा रहावा, यासाठी फाशीचा डोंगर परिसरातील माळरानावर पाच वर्षापूर्वी ‘देवराई’ संस्थेच्या पर्यावरण प्रेमींनी झाडे लावण्यास सुरुवात केली या ठिकाणी शंभरहून अधिक प्रकारची झाडे असून, त्यांचे संवर्धन व जोपासना चांगल्या प्रकारे होत आहे. जनतेमध्ये यामुळे पर्यावरणाविषयी जोपासना करण्याची आवड निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या रहिवाशी यांनीही यात सहभाग नोंदवला आहे.
पक्ष्यांसाठी घरटी बनवण्यात आली असून, एक जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव इथे प्रत्ययास येतो आहे. इथले आणखी एक वैशिष्ट म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील  आदिवासींच्या सहकार्याने रानवेली फुलणार आहेत.  तोरणवेल, पळस, माळकांगणी, शतावरी ह्या काही जाती आहेत. लोकसहभागातून उभे राहणारे देवराई, सारखे प्रकल्प समाजात जागृती निर्माण करणारे आहेत.

नाशिक बाहेर अनेक ठिकाणी पडीक जमिनी आहेत. त्या ठिकाणी वृक्षारोपण केल्यास हरीत-नाशिक साकारण्यास वेळ लागणार नाही. उंच वाढणारी झाडे लावल्यास शहरास सौंदर्यही प्राप्त होईल. प्रदुषणमुक्त नाशिकसाठी  वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया...


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment