TOGETHER FOR NASHIK
‘प्रदुषणमुक्त नाशिकसाठी सायकल चालवा’
सायकलचा वापर जास्तीत जास्त जनतेने करावा, यासाठी जाणीवजागृती करण्यासाठी अभिनव प्रयोग करण्याचे ठरवले आहे. महानगरपालिका व फुलोरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ही शहराच्या सर्वच भागात टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहे.
या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका ठिकाणाहून नेलेली सायकल दुसर्या ठिकाणी जमा करता येईल. यासाठी भाडे नाममात्र आकारले जाईल. दुसर्या टप्प्यात एक हजार सायकली उपलब्ध करण्यात येणार आहेत.
जनतेचे आरोग्य निरोगी राहण्याबरोबरच नाशिकची हवा शुद्ध रहावी. आनंददायी रहावी यासाठी अशाप्रकारचे उपक्रम कृतीशील आहेत. कालांतराने सायकल ट्रॅकचीही उभारणी होणार असून, त्यामुळे सायकलची आवड असणार्यांसाठीच व्यासपीठच ठरणार आहे.
ओझोनचा थर कमी झाल्याने जागतिक तापमान वाढत आहे. वृक्षारोपण कमी होत आहे. औद्योगिक परिसरातील प्रदूषण, रसायनयुक्त पाणी यामुळे शुद्ध हवा दुरापस्त झाली आहे. यासाठीच ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा नारा आता नाशिकमध्ये आपल्याला ऐकू येईल. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी सायकलींग हा उत्तम उपाय असल्याने संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यासाठीच सर्वांनी संघटीत होऊन जनजागृतीपर प्रबोधनपर जाणीवेतून ‘सायकल चालवा’ हा संदेश समाजात न्यावा व स्मार्ट सिटीच्या विकासात हातभार लावावा...
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment