Saturday, 12 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिक स्वच्छतेसाठी तरूणांचा सहभाग

नाशिक शहराच्या विकासासाठी नागरीक सामाजिक संस्था आपल्या परीने हातभार लावत आहेत. त्यामध्ये तरूण पिढीचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे. नाशिकची स्वच्छता महत्त्वाचा विषय ठरत आहे. महावीर पॉलीटेक्निक कॉलेजच्या तृतीय वर्ष डिप्लोमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सफाई अधिक सुलभ करण्यासाठी ट्रायसायकलची निर्मिती केली आहे. ह्या सायकलचे वैशिष्ठ असे की ही ट्रायसायकल आकाराने छोटी असल्याने ती अरूंद रस्त्यावरूनही सहज कचरा जमा करू शकते. पेंडल चालविल्यास फिरणार्‍या ड्रममध्ये कचरा चालक सहजपणे उचलू शकतो. त्यानंतर सायकलवर असलेल्या मोठ्या पेटीत तो कचरा टाकता येतो. त्यासाठी सहकार्याची गरज लागत नाही. ध्वनी प्रदुषणमुक्त हे वाहन नाशिकच्या स्वच्छतेसाठी निश्‍चितच गती देणारे आहे. या वाहनात एका वेळी 30 ते 40 किलो कचरा सहज उचलता येऊ शकतो.
नाशिककरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शहर स्वच्छता हा कायमच महत्त्वाचा विषय राहिला आहे. नागरीकांनी आपल्या वस्तीत, कॉलनीत स्वयंप्रेरणेने कचरा निर्मुलनासाठी हातभार लावावा त्यामुळे आरोग्य चांगले राहिल. स्वच्छतेसाठी या तरूणांनी केलेले संशोधन अनेकांना प्रेरणा देणारे आहे व तरूण पिढीला ‘आपलं नाशिक’ विषयीचा जिव्हाळाही व्यक्त होतो.

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment