TOGETHER FOR NASHIK
पर्यावरणाची चळवळ व नाशिक
नाशिक शहराचा वाढता विस्तार बघता विविध विकासकामे वेगाने होत आहेत. त्यात रस्ता बांधणी हा एक लागवड ही सातत्याने होत असते. यात रस्त्यात असलेल्या चेंबरची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरुन चेंबरचे नुकसान होणार नाही व जिवीतहानी होणार नाही.
हरीत नाशिकच्या विकासासाठी झाडे लावणे, वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. जिथ पडीत जागा व रस्त्याच्या बाजूला जागा आहे. तेथे वृक्ष लागवडीसाठी आवाहन करावे जेणेकरुन प्रबोधनपर जाणिवेतून हे काम होईल. काही दिवसांपूर्वी वनविभागाने हरीत सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे अभियान सुरु केले आहे. त्यात ‘ग्रीन आर्मी’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी व ‘वृक्ष आपल्या दारी’ हे उपक्रम हाती घेतले त्यात अनेकांनी सहभाग नोंदविला आहे. पर्यावरणाशी नाते जोडण्याचा अनोखा प्रयत्न यातून झाला आहे. देवराई, म्हसरूळ परिसरात टेकडीवर हिरवळ फुलवली आहे, हेच या चळवळीचे यश आहे. शाळा महाविद्यालयीन पातळीवर जागतिक पर्यावरण दिन, ओझोन दिनाचे कार्यक्रम सादर होतात व त्यातून सकारात्मक संदेश पोहोचत असतो. शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त नाशिक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. कुठलीही चळवळ ही सर्वसामान्यांपासून सुरु होते व तिथूनच दिशा मिळत असते.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment