Tuesday, 15 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
औद्योगिक प्रदुषण व नाशिक

नाशिकच्या विकासात औद्योगिक वसाहतीचे मोठे योगदान आहे. अंबड व सातपूर परीसरात केमिकल्स आणि औषधी उत्पादनामुळे प्रदुषण होते. तसेच कोटिंग व प्लेटींग उद्योगाचेही वेगळेपण आहे. यातून रासायनिक प्रक्रीयेतून उत्पादन होत असते. याच उद्योगातून तयार होणारे  रासायनिक पाणी शुद्ध करण्यासाठी मेटल फिनिशर्स असोसिएशनकडून (कॉमन इन्फ्ल्युएन्स ट्रीटमेंट प्लान्ट) उभारला जाणार आहे. यासाठी एम.आय.डी.सी.ने अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध करून दिला आहे. 11 कोटींचा हा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धपाणी तयार करण्याची क्षमता असलेला हा महाराष्ट्रातील मोजक्या प्रकल्पातील एक प्रकल्प असणार आहे. एमआयडीसी बरोबरच उद्योजकांनी स्थापन केलेल्या पर्पज व्हेईकललाही स्वत:च्या वाट्याचा निधी उभा करावा लागेल. 
प्रदुषणमुक्त नाशिकसाठी असे प्रकल्प निश्‍चितच मोलाचे योगदान देतील व वाढत्या औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करणार्‍या नाशिकला शुद्ध व सात्त्विक हवा मिळण्यासाठी मदत करतील.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment