Thursday, 17 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिक - नव्या विकास क्रांतीकडे

जागतिकीकरणाच्या प्रचंड मोठ्या रेट्यात नाशिकही नवा चेहरा घेऊन स्पर्धेचा जोरदार सामना करीत आहे. भारताबरोबरच एकूणच जगाच्या बदलत्या वेगवान प्रगतीचे संकेत नाशिक शहरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आर्थिक, सामाजिक, सहकार, सहकार बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातले नवे प्रयोगशील बदलही नाशिक शहराने स्वीकारलेले आहेत व ते मूर्तरूपात आज समोरही आले आहेत. एकंदर विविध क्षेत्रातली बदलांची नव्या युगाची नवी परिभाषा शहराने आत्मसात केली आहे. आव्हाने पेलण्याची नवी ताकद नाशिकने निर्माण केली आहे.
बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे निवार्‍याचे प्रश्‍न बिकट होत आहेत. आजही इथल्या नागरिकांची मानसिकता गावापासून दूर रहावयास जाण्याची नाही. त्यासाठी लहान कमी जागेत जास्तीत जास्त इमारतीचे बांधकाम करतील. त्यासाठी दहा मजल्यांपर्यंत इमारती बांधण्याचे आव्हान बिल्डर मंडळी स्वीकारतील व ते अपरिहार्य आहे. यामुळे भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता इमारतीच्या उंचीची मर्यादा महानगरपालिकेला वाढवावी लागेल. या सार्‍यांचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होईल त्यामुळे ट्रॅफिक जामसारख्या नैमित्तिक प्रश्‍नांमध्ये वाढच होईल. त्यासाठी त्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शासन व महानगरपालिकेची आहे. अर्थातच त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असेलच. 
नाशकात महत्वाच्या कंपन्यांच्या ब्रॅण्डचं आगमन वेगाने होत आहे. त्याच बरोबर आणखी काही आंतरराष्ट्रीय मॉल्सची साखळी नाशकात आली आहे. त्यामुळे नाशिक आर्थिक व यशस्वी उलाढाल देणारी नगरी ठरली आहे. 
अर्थव्यवहारातील मोठी उलाढाल आज नाशकात होत आहे. देश-विदेशातल्या खाजगी बँकांनी, कंपन्यांनी आपले बस्तान नाशकात यशस्वीरित्या बसविलेले आहे. याचेच पुढचे पाऊल इथल्या वेगवान आर्थिक उलाढालीचा अभ्यास करून अनेक जागतिक अर्थ कंपन्या स्थिरावलेल्या आहेत. 


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment